• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /मेट्रो स्टेशन, कार अन् महिलेची एन्ट्री...! 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादव मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट

मेट्रो स्टेशन, कार अन् महिलेची एन्ट्री...! 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादव मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट

नीरज यादवच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. तर या प्रकरणात पोलिसांनी एक महिलेचा जबाब नोंदवला आहे. त्यामुळे या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 30, 2026, 01:24 PM IST|Updated: Oct 30, 2026, 01:27 PM IST
joinshare
मेट्रो स्टेशन, कार अन् महिलेची एन्ट्री...! 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादव मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट
Image Credit: Neeraj Yadav death case

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
‘माझ्या जीवाला धोका, बिल्डरचे गुंड धमकावून घर रिकामी करायला लावतायत' मराठी अभिनेत्याने फडणवीस-शिंदेंकडे मागितली मदत!

‘माझ्या जीवाला धोका, बिल्डरचे गुंड धमकावून घर रिकामी करायला लावतायत' मराठी अभिनेत्याने फडणवीस-शिंदेंकडे मागितली मदत!

2

PNB मध्ये 10.24 कोटींचा घोटाळा? महिला कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांचे लॉगिन वापरून पैसे वळवले? एका पासबुकमुळे प्रकरण उघड!

3

संभाजीनगरमधून लंडनमध्ये MBA साठी गेली, पण मृतदेह सापडला पिंपरीतील आलिशान फ्लॅटमध्ये; 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन्...

4

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होणार

5

'मी गेल्यावर दुसरं लग्न कर...', इंजिनीअरच्या पत्नीने मुलाला घेऊन उचललं टोकाचं पाऊल; पुणे हादरलं!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिल्लीतील  पॅरा-ॲथलीट नीरज यादवच्या मृत्यू प्रकरणात नवीन ट्विस्ट निर्माण झालंय. या प्रकरणात लव्ह अँगल समोर आल्याचे पोलिसांना समजलंय. नीरज यादव यांच्या प्रेयसीशी संबंधित काही धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांनी एका महिलेचा जबाब नोंदवला आहे. ही महिला नीरज यादवची गर्लफ्रेंड असल्याचे बोलं जातंय. नीरज यादवने आत्महत्या केली असं प्रथमदर्शनी पोलिसांना वाटलं. तर कुटुंबियांनी तो आत्महत्या करु शकत नाही, या दाव्यामुळे या प्रकरणात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. नीरज यादवच्या मृत्यूनंतर क्रिडाविश्वात खळबळ माजली होती.

नीरजच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय झालं, काय सांगितलं त्या महिलेने?

पोलिसांनी सांगितलं की, नीरज यादवला त्या महिलेने मृत्यूनंतर हॉस्पिटलला नेलं होतं. एवढंच नाहीतर नीरजच्या मृत्यूपूर्वी हीच महिला काही तासपूर्वी सोबत होती. या महिलेने आपल्या जबाबात असं सांगितलंय की, 27 ऑक्टोबर 2026 ला ही महिला नीरज यादवला भेटायला गेली होती. या महिलेने नीरजला त्या भेटीदरम्यान सांगितलं की, यापुढे ती त्याच्याशी काही संबंध ठेवणार नाहीय. त्यानंतर नीरज तिला स्कॉर्पिओ-एन कारमधून दिल्लीतील मौजपूरला घेऊन गेला होता. तिथून महिला मेट्रोतून घरी गेली होती. महिलेने असंही सांगितलं की, तो विवाहित असून त्याला एक मुलगी आहे, समजल्यावर तिने हे नातं तोडण्याचा निर्णय घेतला.

हेसुद्धा वाचा  - धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

त्यानंतर महिलाला रात्री 9 वाजता नीरजसोबत काहीतरी गडबड झाल्याचा संशय आला. त्यामुळे ती परत मौजपूर स्टेशनवर गेली आणि स्टेशनच्या बाहेर आल्यावर तिला नीरज गाडीजवळ रस्त्यावर पडलेला आढळला. त्यानंतर मी नीरजला  GTB रुग्णालयात तातडीने घेऊन आली. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांनी याबद्दल माहिती दिली. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Breaking News
Sports News
crime