• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /2 वर्षात 14 फ्लॅट्स घेतले अन्... वयाच्या 30 व्या वर्षी निवृत्त झालेल्या तरुणाची गोष्ट; खर्च किती केला? कमाई किती? समजून घ्या गणित पैशाचं

2 वर्षात 14 फ्लॅट्स घेतले अन्... वयाच्या 30 व्या वर्षी निवृत्त झालेल्या तरुणाची गोष्ट; खर्च किती केला? कमाई किती? समजून घ्या गणित पैशाचं

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 19, 2026, 14:05 IST|Updated: Nov 19, 2026, 14:24 IST
joinshare
गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग हा रिअल इस्टेट असतो असं अनेकदा कानावर पडतं, मात्र या गुंतवणुकीच्या माध्यमातून एक तरुण वयाच्या 30 व्या वर्षीच निवृत्त झालाय. त्याने नेमकं हे कसं साध्य केलंय जाणून घेऊयात...

तो वयाच्या 30 व्या वर्षी निवृत्त झालाय. त्याने हे कसं साध्य केलं आणि नेमकं त्याचं खर्च आणि कमाईचं गणित काय समजून घ्या...

flatchina1/10

दोन वर्षात 14 फ्लॅट्स घेतलं अन्...

दोन वर्षांमध्ये 14 फ्लॅट्स घेतल्यानंतर त्याच्या खर्चाचं आणि कमाईचं नेमकं गणित काय? समजून घ्या नक्की त्याने केलंय काय... (फोटो - रॉयटर्सवरुन साभार)
chinahomenews2/10

वयाच्या 30 व्या निवृत्त व्हायचंय का?

तुम्हाला वयाच्या 30 व्या निवृत्त व्हायचंय का? आता हा प्रश्न वाचून तुम्ही म्हणाल की 30 व्या वर्षी कोण निवृत्त होतं? पण चीनमध्ये एक तरुण 30 व्या वर्षी निवृत्त झालाय. मात्र त्याचं इन्कम थांबलेलं नाही. नेमकं त्याने केलंय काय जाणून घेऊयात...
chinahomenews3/10

आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं

चीनमधील या 30 वर्षीय तरुणाने घरं भाड्याने देण्याच्या व्यवसायातून आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं आहे. त्याने स्वत: एवढी घरं घेतली आहेत की आता या क्षेत्रातील गुंतवणूक थांबवून स्वत:कडील सर्व रक्कम 'डिव्हिडंड फंड' आणि जास्त लाभांश देणाऱ्या शेअर्समध्ये वळवण्याचा निर्णय घेतला आहे.
chinahomenews4/10

किती खर्च केला?

ईशान्य चीनमधील जिलिन प्रांतातील फॅन जुन्जी नावाच्या तरूणाने चांगशा शहरात जुने फ्लॅट्स खरेदी करण्यासाठी 20 लाख युआनपेक्षा जास्त (सुमारे 2 कोटी रुपये) रक्कम खर्च केले. मात्र, या सर्व घरांचं मॅनेजमेंट करणं त्याला वाटलेलं तितकं सोपं नव्हतं. त्यामुळे त्याने त्याचा इनव्हेसमेंट प्लॅन बदलला.
chinahomenews5/10

नोकरीनिमित्त शहरात आला अन्...

चीनमधील 'सानलियान लाइफ लॅबोरेटरी'ने दिलेल्या वृत्तानुसार, फॅन नोकरीनिमित्त चांगशा शहरात आला होता. तिथे तो इंटरनेट हेल्थकेअर सेल्स क्षेत्रात काम करायचा. अनेकदा दिवसातील 18 तास तो ऑफिसमध्ये कामात घालवत असे. चीनमधील मोठ्या शहरांमधील मालमत्तेच्या वाढत्या किमती पाहिल्यानंतर, त्याला चांगशाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या फ्लॅट्समध्ये गुंतवणुकीची कल्पना सुचली. यापैकी काही मालमत्तांची किंमत नूतनीकरणाच्या खर्चासह 3 लाख युआन (सुमारे 42 लाख रुपये) इतकी कमी होती.
chinahomenews6/10

दोन वर्षांच्या कालावधीत 14 जुने फ्लॅट्स खरेदी केले

2023 पासून, फॅनने दोन वर्षांच्या कालावधीत 14 जुने फ्लॅट्स खरेदी केले. ज्यासाठी त्याने एकूण 20 लाख युआनपेक्षा जास्त (सुमारे 2 कोटी रुपये) रक्कम खर्च केली. चीनमध्ये 'लाओपोशियाओ' म्हणून ओळखले जाणारे हे फ्लॅट्स आकाराने लहान असून, त्यातील सुविधा जुन्या प्रकारच्या आहेत. येथील जागाही मर्यादित आहे.
chinahomenews7/10

14 फ्लॅट्सपैकी 11 सध्या भाड्याने14 फ्लॅट्सपैकी 11 सध्या भाड्याने; कमाई किती?

त्याने प्रामुख्याने 'शियांग्या हॉस्पिटल' परिसरातील मालमत्ता खरेदी केल्या. या फॅट्सच्या व्यवस्थापनाचं काम सोपे व्हावे म्हणून, त्याने सर्व फ्लॅट्ससाठी एकसारखीच नूतनीकरण योजना राबवली आणि दुरुस्तीसाठी आवश्यक सुटे भाग आधीच तयार ठेवले. त्याच्या 14 फ्लॅट्सपैकी 11 सध्या भाड्याने दिलेले आहेत, ज्यातून त्याला वार्षिक सुमारे 2 लाख 10 हजार युआन (सुमारे 29 लाख रुपये) उत्पन्न मिळते.
chinahomenews8/10

सर्वात स्वस्त फ्लॅटची किंमत किती?

त्याच्या सर्वात स्वस्त फ्लॅटची किंमत 1 लाख 50 हजार युआन होती, ज्यातून त्याला दरमहा 1700 युआन (सुमारे 23,931 रुपये) भाडं मिळतं. तर, त्याच्या सर्वात महागड्या मालमत्तेसाठी—कर, एजन्सी शुल्क आणि नूतनीकरणाच्या खर्चासह—सुमारे 3 लाख 10 हजार युआन (सुमारे 43 लाख रुपये) खर्च आले; यातून त्याला दरमहा 2200 युआन भाडे मिळते.
chinahomenews9/10

आर्थिक स्वातंत्र्य आणि लवकर निवृत्ती

वयाच्या 30 व्या वर्षी, फॅनने 'आर्थिक स्वातंत्र्य आणि लवकर निवृत्ती' हे आपले ध्येय गाठले आहे. मात्र, भाड्याने दिलेल्या मालमत्तांचे मॅनेजमेंट करणे फॅनच्या अपेक्षेपेक्षा अधिक त्रासदायक ठरत आहे. एजन्सी शुल्क, कर, दुरुस्तीचा खर्च आणि भाडेकरूंशी संबंधित जबाबदाऱ्यांमुळे भाड्यापासून मिळणारा नफा हळूहळू कमी झाला असून मालमत्तेच्या किमतीत झालेली घसरणही त्याने गुंतवलेल्या रकमेसाठी जोखीम ठरत आहे.
chinahomenews10/10

मालमत्ता खरेदी करणे थांबवणार

26 ऑक्टोबर रोजी फॅनने जाहीर केले की, तो आता मालमत्ता खरेदी करणे थांबवणार आहे. त्याच्या मते, अशा गुंतवणुकीसाठीचा सर्वोत्तम काळ आता निघून गेला आहे. आता तो अधिक फ्लॅट्स खरेदी करण्याऐवजी आपली गुंतवणूक 'डिव्हिडंड फंड' आणि जास्त लाभांश देणाऱ्या शेअर्समध्ये वळवण्याचा विचार करत आहे. यामुळे त्याला मासिक भाड्याऐवजी गुंतवणुकीतून मिळणारा परतावा (डिव्हिडंड) मिळू शकेल. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य फ्रीपिकवरुन साभार)
TAGS:
Home Loan
China News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.