भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेच्या चौथ्या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे 244 धावांनी टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला, या पराभवानंतर कॅप्टन श्रेयस अय्यरने दु:ख व्यक्त केले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध 334 धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघ अवघ्या 89 धावांवर सर्वबाद झाला. सामन्यानंतर, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने या मानहानीकारक पराभवाबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले.
1/8
श्रेयस अय्यरचे पराभवानंतर वक्तव्य
झालेल्या चौथ्या सामन्यामध्ये मॅट हेन्रीच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघ पूर्णपणे हतबल दिसला आणि एकही फलंदाज 30 धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2/8
श्रेयस अय्यरचे पराभवानंतर वक्तव्य
विराट कोहली, रोहित शर्मा आणि एकदिवसीय कर्णधारपदी पदार्पण करणारा श्रेयस अय्यर यांना आपले खातेही उघडता आले नाही. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/8
श्रेयस अय्यरचे पराभवानंतर वक्तव्य
या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर खूप निराश दिसला. हा पराभव विसरणे सोपे जाणार नाही, असे त्याने कबूल केले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
4/8
श्रेयस अय्यरचे पराभवानंतर वक्तव्य
न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात 244 धावांनी झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने कबूल केले की, पहिल्या डावानंतर संघाला विजयाचा आत्मविश्वास होता, पण मॅट हेन्रीने सामन्याचे चित्रच पालटले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/8
पराभवानंतर श्रेयस अय्यरचे वक्तव्य
सामन्यानंतर श्रेयस म्हणाला, "हा पराभव स्वीकारणे कठीण आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डावात विकेट्समध्ये मोठा फरक दिसून आला. मात्र, याचे संपूर्ण श्रेय मॅट हेन्रीला जाते. त्याने पहिल्या चेंडूपासूनच अचूक टप्पा आणि दिशा राखून गोलंदाजी केली. त्याची कामगिरी उत्कृष्ट होती." फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/8
पराभवानंतर श्रेयस अय्यरचे वक्तव्य
श्रेयस पुढे म्हणाला की, भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात शॉर्ट बॉल आणि अचूक लेंथचा वापर करून जवळपास प्रत्येक रणनीती वापरून पाहिली. तो म्हणाला, "आम्ही पहिल्या डावात जवळपास सर्व काही करून पाहिले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/8
पराभवानंतर श्रेयस अय्यरचे वक्तव्य
न्यूझीलंडचे फलंदाज ज्या प्रकारे उसळणारे चेंडू खेळत होते, त्यामुळे आम्हाला विश्वास बसला की खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. नंतर, त्यांनीही 333 धावा केल्या. मात्र, आमच्याकडूनही काही झेल सुटले, पण खेळात असे घडतच असते." फोटो सौजन्य - सोशल मिडिया
8/8
पराभवानंतर श्रेयस अय्यरचे वक्तव्य
श्रेयस अय्यरने पुढे स्पष्ट केले की, ड्रेसिंग रूममध्ये संघाला वाटत होते की ३३४ धावांचे लक्ष्य सहज गाठता येईल. मात्र, चेंडूच्या स्विंग आणि सीममुळे फलंदाजांना बरीच अडचण निर्माण झाली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया