भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना पार पडला, या सामन्याच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवून मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर त्याचे मत व्यक्त केले आहे. काय म्हणाला टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गील?
1/8
काय म्हणाला शुभमन गिल?
एका क्षणी आम्हाला वाटले की हे एक सोपे लक्ष्य असेल, पण आमच्या विकेट्स पडतच राहिल्या. मात्र, शेवटी आम्ही सामना जिंकण्यात यशस्वी झालो." फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2/8
काय म्हणाला शुभमन गिल?
गिल म्हणाला, "मैदानावरची परिस्थिती सोपी नव्हती. मला वाटतं आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली. त्यांना 130-140 धावांवर रोखणे चांगले होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/8
काय म्हणाला शुभमन गिल?
गिलने गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक केले आणि सांगितले की न्यूझीलंडला सुमारे 130-140 धावांवर रोखणे ही संघासाठी चांगली गोष्ट होती. मात्र, हे लक्ष्य सहज गाठले जाईल अशी त्याला अपेक्षा होती. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
4/8
काय म्हणाला शुभमन गिल?
न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर, भारतीय कर्णधार शुभमन गिलने कबूल केले की धावांचा पाठलाग करणे सोपे नव्हते. तो म्हणाला की खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/8
टीम इंडियाची खराब कामगिरी
प्रत्युत्तरात, भारतीय संघाने 26 ओव्हरमध्ये विकेट्स गमावून 113 धावा केल्या होत्या, पण त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी भारत डीएलएस पद्धतीनुसार ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा पुढे होता, त्यामुळे भारतीय संघाला विजेता घोषित करण्यात आले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/8
पावसामुळे झाला खेळ खराब
पावसामुळे सामना प्रत्येकी 47 षटकांचा करण्यात आला, ज्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला केवळ 134 धावांवर गुंडाळले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/8
4 धावांनी रोमांचक विजय
शनिवारी वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने डकवर्थ लुईस (DLS) पद्धतीनुसार 4 धावांनी रोमांचक विजय नोंदवला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
8/8
टीम इंडियाचा मालिकेचा दुसरा विजय
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया