Vaibhav Sooryavanshi 7 Records : भारताचा 15 वर्षांचा विस्फोटक ओपनर वैभव सूर्यवंशीने रायजिंग स्टार्स आशिया कप 2026 इंडिया ए विरुद्ध यूएई सामन्यात तुफान फटकेबाजी करून द्विशतक ठोकले. यासह त्याने मॅच विनिंग खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. या दरम्यान वैभवने 7 मोठं रेकॉर्ड आपल्या नावावर केले.
1/7
प्रोफेशनल क्रिकेटमधील सर्वात तरुण द्विशतकवीर :
केवळ 15 वर्षे 242 दिवस वयाच्या वैभव सूर्यवंशीने व्यावसायिक क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. वैभव सूर्यवंशीने अवघ्या 52 बॉलमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले.
2/7
लिस्ट A क्रिकेटमध्ये दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक :
वैभव सूर्यवंशीने अवघ्या 16 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. लिस्ट-ए क्रिकेटमधील हे त्याचे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. याआधी 21 जून 2026 रोजी श्रीलंका ए विरुद्धच्या ट्राय सीरिजच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने केवळ 11 बॉलमध्ये अर्धशतक झळकावून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता.
3/7
लिस्ट-A मध्ये सर्वात वेगवान शतक :
वैभव सूर्यवंशीने फक्त 28 बॉलमध्ये शतक ठोकले असून तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जेक फ्रेजर-मॅक्गर्कने वर्ष 2023 मध्ये साउथ ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना तस्मानिया विरुद्ध एक लिस्ट ए सामन्यात 29 बॉलमध्ये शतक ठोकलं आहे.
4/7
लिस्ट-A मधील सर्वात 150 धाव :
वैभव सूर्यवंशीने लिस्ट-ए क्रिकेटच्या एका डावात केवळ 40 बॉलमध्ये 150 धावा करून नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 धावा करण्याचा स्वतःचाच मागील वर्षीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे. 24 डिसेंबर 2025 रोजी अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात, वैभव सूर्यवंशीने 59 बॉलमध्ये 150 धावांचा टप्पा गाठला होता. त्याच सामन्यात त्याने 84 बॉलमध्ये 190 धावांची खेळी साकारली.
5/7
लिस्ट A मधील सर्वात वेगवान द्विशतक :
वैभव सूर्यवंशीने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक ठोकले असून, त्याने अवघ्या 52 बॉलमध्ये हा टप्पा गाठला आहे. याआधी न्यूझीलंडचा क्रिकेटपटू चॅड बोव्स याच्या नावावर लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतकाचा विक्रम होता. त्याने 103 बॉलमध्ये तो पूर्ण केला होता. बोव्सने हा विक्रम 2024 मध्ये न्यूझीलंडच्या देशांतर्गत स्पर्धा 'फोर्ड ट्रॉफी'मध्ये कँटरबरीकडून खेळताना ओटागोविरुद्ध नोंदवला होता. त्या डावात त्याने 110 बॉलमध्ये 205 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये 27 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.
6/7
एका लिस्ट-A क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार :
वैभव सूर्यवंशीने एका लिस्ट-A डावात 28 सिक्स मारले जो 'लिस्ट-ए' क्रिकेटमधील एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियन फलंदाज डार्सी शॉर्टच्या नावावर होता, ज्याने 2018 मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळताना क्वीन्सलँडविरुद्धच्या 'लिस्ट-ए' सामन्यात एका डावात 23 सिक्स मारले होते.
7/7
प्रोफेशनल क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स :
वैभव सूर्यवंशीने 28 सिक्स मारून पुरुषांच्या व्यावसायिक क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. याआधी, रणजी ट्रॉफी 2023-24 च्या प्लेट ग्रुप सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध हैदराबादसाठी खेळताना तन्मय अग्रवालने एका प्रथम श्रेणी डावात 26 षटकार मारले होते.