• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /कोण आहेत निधी राजदान? CM ओमर अब्दुल्लांच्या ‘नव्या प्रवासा’च्या पोस्टने आल्या चर्चेत!

कोण आहेत निधी राजदान? CM ओमर अब्दुल्लांच्या ‘नव्या प्रवासा’च्या पोस्टने आल्या चर्चेत!

Reported ByPravin Dabholkar
Published: Oct 31, 2026, 05:19 PM IST|Updated: Oct 31, 2026, 05:29 PM IST
joinshare
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि पत्रकार निधी राजदान यांनी एकत्रित फोटो शेअर करत नव्या प्रवासाची घोषणा केली.

 दोघांच्या पोस्टमुळे साखरपुड्याची चर्चा आहे. संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेऊया.

Omar Abdulla and Nidhi Rajdan1/8

कोण आहेत निधी राजदान? CM ओमर अब्दुल्लांच्या ‘नव्या प्रवासा’च्या पोस्टने आल्या चर्चेत!

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि ज्येष्ठ पत्रकार निधी राजदान यांच्या वैयक्तिक आयुष्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दोघांनीही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. उमर अब्दुल्ला यांनी ‘कालपासून एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली’ असा संदेश दिला, तर निधी राजदान यांनी 'इट्स डन ब्रो' असे लिहिले. या पोस्टनंतर दोघांचा साखरपुडा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नेमके काय घडले आणि या घटनेची पार्श्वभूमी काय, जाणून घेऊया.
Nidhi Rajdan Personal Life2/8

निधी राजदान यांचीही प्रतिक्रिया

निधी राजदान यांनीही उमर अब्दुल्ला यांच्यासोबतचे फोटो शेअर केले. इट्स डन ब्रो असा छोटा संदेश आणि अंगठीचा इमोजी त्यांनी पोस्ट केला. दोघांच्या पोस्टमधील समान संकेतांमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले.
Omar Abdulla Engagement3/8

30 ऑक्टोबरला पार पडला सोहळा?

उमर अब्दुल्ला यांचा साखरपुडा झाल्याचे म्हटले जात आहे. दोघांनी फोटो शेअर केले असले तरी सोहळ्याचे ठिकाण, उपस्थित पाहुणे आणि इतर तपशील दोघांनीही जाहीर केलेले नाहीत.
Nidhi Rajdan4/8

निधी राजदान कोण आहेत?

निधी राजदान या देशातील परिचित पत्रकार आणि वृत्तनिवेदिका आहेत. त्यांनी खासगी वृत्तवाहिनी दीर्घकाळ काम केले असून राजकीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील वार्तांकनासाठी त्या ओळखल्या जातात. पत्रकारितेतील त्यांच्या कारकिर्दीमुळे या घडामोडीला विशेष लक्ष मिळत आहे.
Omar Abdulla Relation5/8

दोघांच्या नात्याची चर्चा आधीपासून

उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांच्याबाबत यापूर्वीही चर्चा झाली होती. ऑक्टोबर 2024 मध्ये उमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी निधी राजदान कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यानंतरही दोघांचे एकत्रित फोटो आणि सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थिती चर्चेत राहिली.
Payal Omar Abdulla6/8

पायल अब्दुल्ला यांच्याशी जुलैमध्ये घटस्फोट

उमर अब्दुल्ला यांचे यापूर्वी पायल अब्दुल्ला यांच्याशी लग्न झाले होते. 1 सप्टेंबर 1994 रोजी त्यांचा विवाह झाला होता. दोघे अनेक वर्षांपासून वेगळे राहत होते. 31 जुलै 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने परस्पर संमतीने त्यांचा विवाह संपुष्टात आणण्याचा आदेश दिला.
Omar Abdulla Personal Life7/8

दोन मुलांचे वडील आहेत उमर अब्दुल्ला

उमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला यांना दोन मुलगे आहेत. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोन्ही पक्षांनी परस्परांमधील वाद मिटवून प्रलंबित खटले मागे घेण्यास सहमती दर्शवली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात या समझोत्याची नोंद आहे.
Omar Abdulla Life Update8/8

लग्न की साखरपुडा?

उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांच्या पोस्टमुळे त्यांच्या नात्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. असे असले तरी पोस्टमध्ये लग्न झाल्याची स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियामध्ये चर्चेला उधाण आलंय.
TAGS:
india

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
मुंबईत IBPS मध्ये नोकरीची मोठी संधी अन् 14 लाखांचं पॅकेज; कुठे करायचा अर्ज?

मुंबईत IBPS मध्ये नोकरीची मोठी संधी अन् 14 लाखांचं पॅकेज; कुठे करायचा अर्ज?

2

ना नरेंद्र मोदी, ना अमित शाह, मग कोण असेल भारताचा पुढचा पंतप्रधान? उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे मोठं वक्तव्य

3

शाळेच्या वर्गात सहावीच्या चिमुरडीवर हल्ला! तिसरीतील विद्यार्थ्याचे कृत्य CCTV मध्ये कैद; शाळेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न!

4

बांग्लादेशच्या पराभवानंतर WTC गुणतालिकेत मोठा फेरबदल, भारताला झाला फायदा! वाचा संपूर्ण समीकरण

5

धनत्रयोदशीला पत्नी, आई किंवा बहिणीसाठी काय घ्याल? 'या' खास भेटवस्तू; गिफ्टसाठीही बेस्ट पर्याय

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.