दिवाळीत मोठ्या प्रमाणात लोक प्रवास करतात. रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते. अशावेळी पश्चिम रेल्वे एक मोहिम राबवणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने मोहीम हाती घेतली आहे. विनातिकीट तसेच अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.
1/7
दिवाळीत पश्चिम रेल्वेचे दीप ऑपरेशन, टीसींसाठी 15 बॉडी कॅमेरे, 30 जॅकेट अन्....
पश्चिम रेल्वेने मोहीम हाती घेतली आहे. ऑपरेशन दीप या नावाने दिवसांचे विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात येत आहे.
2/7
विशेष मोहीम
14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ती विशेष मोहीम सुरू राहणार आहे. या अभियानांतर्गत रेल्वेच्या तपासणी पथकांकडून स्थानकांवर तसेच रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी केली जाणार आहे.
3/7
चार टप्प्यांतील कार्यपद्धती
रेल्वेने दीप या शब्दाची फोड देखील केली आहे. दीप या नावातून मोहिमेची चार टप्प्यांतील कार्यपद्धती निश्चितः करण्यात आली आहे, यामध्ये डी महणजे डिटेक्टिव्ह अर्थात विनातिकीट आणि अनिगमित प्रवास करणाऱ्यांचा शोध घेणे,
4/7
चार टप्पांचा समावेश
इ म्हणजे एक्झामिन अर्थात तिकिटांची आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, दुसरे इ म्हणजे इन्फोस अर्थात रेल्वे नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आणि पी म्हणजे पेनॉलिझ अर्थात नियमांचे उल्लंघन करणा-यांकडून दंड वसूल करणे, अशा चार टप्पांचा समावेश आहे.
5/7
तंत्रज्ञानाच वापर
तपासणीसासाठी बॉडी वॉर्न कॅमेरे, काळा कोट तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना सुरक्षा, कार्यक्षमता आणि प्रवाशांशी होणारा संवाद अधिक पारदर्शक करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने तंत्रज्ञानाच वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
6/7
15 बॉडी कॅमॅरे
तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना बॉडी-वॉर्न कॅमेरे आणि विशेष स्वरूपाची काळया रंगाचे कोट (जॅकिट) दिली. आहेत. सुरुवातीला 15 बॉडी कॅमॅरे, 30 विशेष काळ्या रंगाया जैकेटची व्यवस्था केली आहे.
7/7
कठोर आर्थिक दंडाची तरतूद
जन विश्वास (दुरुस्ती तरतुदी) अधिनियम, 2026 अंतर्गत करण्यात आलेल्या या बदलामुळे अधिक कठोर आर्थिक दंडाची तरतूद केली आहे. 1989 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत तिकीटविना प्रवासासाठीचा किमान दंड 100 रुपये केला आहे.