आजचे राशीभविष्य 31 ऑक्टोबर 2026 : ऑक्टोबरचा शेवटचा शनिवार या राशीचे लोक वाहन किंवा घर खरेदीचे स्वप्न करणार पूर्ण, तर यांनी घ्यावी काळजी
Aajche Rashi Bhavishya 31 October 2026 : आज शनिवार सिद्ध योग आहे. दिवाळीपूर्वीचा शनिवार 12 राशीच्या लोकांसाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशीभविष्य...
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 31 October 2026 in Marathi : पंचागानुसार शनिवारी आश्विन कृष्ण पक्षाची पष्ठी तिथी आहे. तर पुनर्वसू नक्षत्र आणि सिद्ध योग आहे. शनिवार हा शनिदेव आणि हनुमानजीची उपासना करण्याचा वार आहे. असा आजचा शनिवारचा दिवस काम, करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनासाठी मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार आहे, जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
मेष (Aries Zodiac)
तुमच्यासाठी आजचा दिवस बेस्ट असणार आहे. व्यवसाय किंवा करिअरमधून फायदा होणार आहे. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. मानसिक शांती मिळणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. कुटुंबाची साथ मिळणार आहे. जोडीदारासोबत वेळ व्यतित करणार आहात. जनसंपर्क सुधारणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
आजचा दिवस चांगला असून समस्या सुटणार आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहात. रेंगाळलेली कामं मार्गी लागणार आहे.
कर्क (Cancer Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेणार आहा. करिअर असो किंवा व्यवसायात प्रगती करणार आहात. कानावर चांगली बातमी पडणार आहे.
सिंह (Leo Zodiac)
सकारात्मक दिवसाची सुरु तुम्ही उत्साहाने करणार आहात. कुटुंबातील सदस्यासोबत असलेले मतभेद दूर होतील. तणाव कमी होणार आहे. महिलांसाठी आजचा दिवस आनंदी आनंदगडे असा असणार आहे.
कन्या (Virgo Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहणार आहे. जोडीदारासोबत आनंदाने दिवस व्यतित करणार आहात. कोणत्याही जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करु नका. आरोग्य उत्तम राहणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
आजचा दिवस आनंदी असणार आहे. जोडीदारासोबत चित्रपट किंवा डिनरचा प्लॅन ठरणार आहे. वाहन खरेदीचा विचार करणार आहात. आरोग्याबद्दल थोडी कुरकूर असणार आहे.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
आजचा दिवस उत्तम असून कामाचा भार वाढणार आहे. आर्थिक तणाव जाणवणार आहे. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी जास्त वेळ थांबावे लागणार आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
आजचा दिवस सकारात्मक असून तुमच्या समस्या सहज मार्गी लागणार आहे. कामाच्या ठिकाणीही तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक कामांमध्ये संतुलन राखा.
मकर (Capricorn Zodiac)
यश आणि प्रगतीने भरलेला आजचा दिवस असणार आहे. कुटुंबासोबत आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळणार आहे.
कुंभ (Aquarius Zodiac)
घराची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. बॉसकडून नवीन जबाबदारी मिळणार आहे. व्यावसायिक नवीन करार करणार आहेत. फक्त आज प्रकृतीकडे लक्ष द्या.
मीन (Pisces Zodiac)
आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. निराश कमी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. खरेदीचे योग्य ठरणार आहेत. नाते अधिक घट्ट होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)