आजचे राशीभविष्य 7 नोव्हेंबर 2026 : दिवाळीचा भाकड दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा? कोणाशीही विनाकारण वाद घालू नका, तर या लोकांनी पैशांबद्दल...
Aajche Rashi Bhavishya 7 November 2026 : आज दिवाळीचा भाकड दिवस आहे. म्हणजे आज दिवाळीचा कुठलाही दिवस किंवा सण नाही. असा हा आजचा दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा जाणार आहे जाणून घ्या.
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 7 November 2026 in Marathi : आज शनिवार 7 नोव्हेंबर दिवाळीचा भाकड दिवस आहे. भाकड दिवस म्हणजे ज्यादिवशी दिवाळीचा कुठलाही दिवस नसतो किंवा सण नसतो. दिवाळी सुरु झाल्यावर पाच सणामधील एखादा दिवस कुठलाही सण नसणे. पण आज नक्षत्राच्या स्थितीनुसार प्रीती योग, बुधादित्य योग, वाशी योग, आनंदादि योग आणि सुनाफा योग जुळून आला आहे. मेष ते मीनचे आजचे राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
मेष (Aries Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबासोबत आनंद साजरा करणार आहात. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस खास असणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद आनंद घेऊन आला आहे. तुमचे उत्पन्न आणि खर्च संतुलित राहणार आहे. तुमच्या व्यवसायत वाढ होणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुम्हाला थोडं भावनिक वाटणार आहे. कामाच्या ठिकाणी वेग वाढवावा लागणार आहे.
कर्क (Cancer Zodiac)
कामाच्या ठिकाणी चांगला नफा मिळणार आहे. घर असो कामाचे ठिकाणी तुमच्यामध्ये उत्साह असणार आहे. आज पैशाची गरज असल्यास कर्ज घेणे टाळा. घरातील वडीलधाऱ्याचे आरोग्य चांगले राखा.
सिंह (Leo Zodiac)
आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आरोग्य नेहमीपेक्षा चांगलं राहणार आहे. कोणाशीही विनाकारण वाद घालणे टाळा.
कन्या (Virgo Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन आला आहे. मालमत्ता खरेदीचे योग आहेत. तुमच्या नात्यात आज गोडवा असणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
आजचा दिवस उत्साहाने भरलेला असणार आहे. धार्मिक कार्यात रूची वाढणार आहे. कुटुंबात आनंदी दिवस व्यतित करणार आहात. विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम दिवस असणार आहे.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडणार आहात. नवीन कल्पनेवर काम करणार आहात.
धनु (Sagittarius Zodiac)
आज तुमच्या आत्मविश्वास द्विगुणीत होणार आहे. एक नवीन दृष्टिकोन तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आहे.
मकर (Capricorn Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तुमची मैत्री आज नव्याने अधिक दृढ होणार आहे. घरात शांतता आणि आनंदी वातावरण असणार आहे. कामातील अडथळे दूर होणार आहेत.
कुंभ (Aquarius Zodiac)
तुमच्या विरोधकांचा आज पराभव होणार आहे. कुटुंबात एक नवीन विषयावर चर्चा होणार आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम असणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. कुटुंबातील समस्या दूर होणार आहे. अनावश्यक खर्च कमी करावे लागणार आहेत.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)