दिवाळीच्या पहिला सण वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत, जाणून घ्या सणांची योग्य तिथी, शुभ मुहूर्त अन् पूजा विधी
दिवाळी यंदा किती दिवस आहे, दिवाळी कोणता सण कोणत्या तारखेला, त्यादिवशीची पूजेचा शुभ मुहूर्त सगळी माहिती एका क्लिकमध्ये जाणून घ्या.
दिवाळी आनंद आणि प्रकाशाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात यंदा दिवाळी किती दिवस आहे. वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान आणि लक्ष्मीपूजन, सोमवती अमावस्या, दिवाळी पाडवा म्हणेज बालिप्रतिपदा आणि भाऊबीज ते देव दिवाळी म्हणजे कार्तिक पौर्णिमा या सणांच्या तारखा, पूजेचा शुभ मुहूर्त सगळी माहिती जाणून घ्या.
5 नोव्हेंबर 2026 (गुरुवार) – वसुबारस
दिवाळी सुरुवात वसुबारसेपासून सुरु होते. या दिवशी हिंदू धर्मानुसार गाई-वासराची पूजा करण्याची परंपरा आहे. पूजेसाठी शुभ मुहूर्त पंचांगानुसार संध्याकाळी 5:11 ते 5:54 पर्यंत असणार आहे.
6 नोव्हेंबर 2026 (शुक्रवार) – धनत्रयोदशी
या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच आरोग्याची देवता धन्वंतरीचे पूजन केले जाते.
7 नोव्हेंबर 2026 (शनिवार) – नरक चतुर्दशी
अभ्यंगस्नान आणि पहाटेच्या फटाक्यांच्या आतषबाजीत हा सण साजरा केला जाईल.
8 नोव्हेंबर 2026 (रविवार) – लक्ष्मीपूजन व अभ्यंग स्नान
दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजन या दिवशी आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. तिचा कृपाशिर्वाद मागितला जातो. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 05.45 ते रात्री 08.12 वाजेपर्यंतचा आहे. म्हणजे जवळपास 3 तास 15 मिनिटांच्या या शुभ मुहूर्तावर तुम्हाला पूजा करायची आहे.
9 नोव्हेंबर 2026 (सोमवार) – सोमवती अमावस्या
या दिवशी सोमवती अमावस्या आहे.
10 नोव्हेंबर 2026 (मंगळवार) – दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा)
व्यापारी वर्ग नवीन वर्षाची सुरुवात याच दिवशी करतात, तसेच हा साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जातो.
11 नोव्हेंबर 2026 (बुधवार) – भाऊबीज
बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण भाऊबीज या दिवशी आहे.