ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या विशिष्ट आणि ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांच्या स्थिती बदल्यामुळे 12 राशींवर या प्रभाव पडतो. काहींसाठी हे ग्रहांचे हे गोचर लाभदायक असतं. तर काहींसाठी ते संकट घेऊन येत असतं. लवकरच 31 ऑक्टोबरला गुरू ग्रहाचे गोचर होणार आहे. म्हणजे गुरु सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे तीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या तीन राशी जाणून घ्या.
गुरु गोचरमुळे या राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक जीवनात सुख आणि समृद्धी घेऊन आला आहे. व्यावसायिकांना पार्टनरशीपमध्ये मोठा नफा मिळण्याचे संकेत आहेत. तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा असेल तर गुरु तुम्हाला सकारात्मक साथ देणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. विवाह इच्छुकांना चांगला जोडीदार मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. तर तुमची ऑफिसमध्ये प्रतिष्ठा वाढणार आहे.
गुरु गोचर तुमच्यासाठी आनंदच आनंद घेऊन आला आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची चांगली संधी तुम्हाला मिळणार आहे. ज्यांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी संधी चालून येणार आहे. प्रेम जीवन असो किंवा वैवाहिक जीवन त्यात आनंद आणि प्रेम द्विगुणीत करणारे क्षण येणार आहे. समाजात तुमचा दर्जा वाढणार आहे. तर आरोग्यासंबंधी समस्या दूर होतील.
तुमच्यासाठी गुरु गोचर नवीन दिशा घेऊन आलं आहे. गुरु गोचर तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि भाग्यशाली ठरणार आहे. करिअर असो किंवा शिक्षणातील मोठं यश असो प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळणार आहे. तर वडिलोपार्जित व्यवसायात गुंतलेल्यांनाही नफा प्राप्त होणार आहे. तुमच्या आरोग्यातही सुधारणा पाहिला मिळणार आहे. या राशीत जन्मलेल्या लोकांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी कानावर पडणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)