SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आजपासून 'या' 4 राशींसाठी अडचणी वाढणार, राहु-केतु गोचरमुळे करिअर - आर्थिक बाबतीत सावध राहा अन्यथा...

पंचांगानुसार आज (25 नोव्हेंबर) पापी राहू ग्रह आणि केतू आपली स्थिती बदलणार आहे. राहू - केतूच्या गोचरमुळे चार राशीच्या लोकांसाठी संकटाचा काळ सुरु होणार आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 25, 2026, 10:00 IST | Updated: Nov 25, 2026, 10:47 IST
Image Credit: Rahu Ketu Gochar 2026
Join

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह एका ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. दृष्ट केतू आणि राहू याचं भासमान गोचर होणार आहे. आज (25 नोव्हेंबर) संध्याकाळी 4:34 वाजता राहू कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर केतू सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या दोन ग्रहांच्या गोचरमुळे काही राशींसाठी जरी सुवर्णकाळ असला. तरी चार राशीच्या लोकांसाठी तो संकटाचा ठरणार आहे. या चार राशीच्या लोकांना या काळात अत्यंत सावध राहायचं आहे.

मकर रास  (Capricorn Zodiac)  

या काळात जीवनात काही बदल पाहिला मिळणार, ज्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे. करिअरमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहे. तर वैयक्तिक जीवनात चढ - उतार पाहिला मिळणार आहे. या काळात कुठलेही निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागणार आहे. नाहीतर तुम्हाला पश्चात्ताप होण्याचे संकेत आहेत. आरोग्याची विशेष काळजी घ्या. 

धनु रास (Sagittarius Zodiac)

तुम्हाला या काळात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या दिवसांमध्ये पैसे जपून वापरा. तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याचे चिन्ह आहे. राहू आणि केतूमुळे, डिसेंबर महिन्यात तुम्हाला करिअरमध्ये आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होण्याचे संकते आहेत. वाणीवर नियंत्रण ठेवा, कारण तुमचे कठोर शब्द नात्यांमध्ये तणाव आणणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Weekly Numerology : मूलांक 1 आणि 6 साठी देव दिवाळीचा आठवडा ठरणार लकी, मात्र या लोकांनी काळजी घ्यावी, नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा 1 ते 9 मूलांकासाठी कसा?

 

सिंह रास  (Leo Zodiac)

राहू आणि केतूचे गोचर या लोकांसाठी काहीसे आव्हानात्मक ठरणार आहे. तुम्हाला करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. विरोधकांपासून सावध राहावे लागणार आहे.  कोणत्याही गोष्टीत घाई करणे तुम्हाला महागात पडू शकतं. डिसेंबरमध्ये कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. तुमच्या खर्चात अचानक वाढ होणार आहे. 

कर्क रास (Cancer Zodiac)  

राहू आणि केतूचे गोचर या लोकांसाठी नवीन अडचणी निर्माण करणार आहे. तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तसंच भागीदारीच्या व्यवसायात तोटा होणार आहे. तुम्हाला या काळात अत्यंत सावध राहावे लागणार आहे. कोणत्याही गोष्टीवर रागाने प्रतिक्रिया देऊ नका. कारण यामुळे नातेसंबंधांमधील तणाव वाढण्याचा धोका आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबतही काळजी घ्यायची आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES