'तुम्हाला त्याला बेंचवरच ठेवायचे असेल, तर त्याला घरी पाठवा...', वैभवला वगळल्यानंतर माजी खेळाडू संतापला!
चौथ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला वगळण्यात आले आणि इशान किशनला प्लेइंग 11 मध्ये संघात स्थान मिळाले. या निर्णयावर भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि कॅामेंटेटर आकाश चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टी20 मालिकेचा शेवटचा सामना शिल्लक आहे, त्यानंतर भारताचा संघ एकदिवसीय मालिकेचे पाच सामने खेळणार आहेत. पहिल्या तीन सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये अभेद्य आघाडी घेतली आहे. तर चौथ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्यामध्ये इशान किशन प्लेइंग 11 चा भाग होता, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये त्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागेवर वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. पण चौथ्या सामन्यामध्ये त्याला पुन्हा बेंचवर बसवण्यात आले होते, यावर आता आकाश चोप्राने टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना सल्ला दिला आहे.
इशान किशनच्या अनुपस्थितीमध्ये दुसऱ्या न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यामध्ये 4 तर तिसऱ्या सामन्यामध्ये 45 धावा केल्या होत्या. चौथ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला वगळण्यात आले आणि इशान किशनला प्लेइंग 11 मध्ये संघात स्थान मिळाले. या निर्णयावर भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि कॅामेंटेटर आकाश चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे. आकाश चोप्राने वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मधून वगळल्यानंतर म्हणाला की, "जर तुम्ही जास्त तात्विक विचार केला तर, नियमांनुसार जेव्हा कोणीतरी जखमी होते तेव्हा वैभव संघात आला होता, त्यामुळे ईशान तंदुरुस्त झाल्यावर त्याला बाहेर बसावे लागले असते. पण जरा विचार करा, हा केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाणारा सामना होता."
हे ही वाचा
श्रेयस अय्यरने मोडला रोहित शर्माचा रेकॅार्ड, अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला कर्णधार!
वैभवला बेंचवर बसवल्यानंतर संघ व्यवस्थापनाला काही प्रश्न केले आहेत, पुढे आकाश चोप्रा म्हणाला की, संघामधील एखादा खेळाडू जखमी असेल तरच या तरुण खेळाडूला संधी मिळेल का?" तो म्हणाला की, जर हेच धोरण असेल, तर या तरुण खेळाडूला बेंचवर बसवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. जेव्हा कोणी जखमी असेल किंवा कोणीही उपलब्ध नसेल, तेव्हाच तुम्ही वैभव सूर्यवंशीला खेळवणार का? जर तसे असेल, तर त्याला घरी परत पाठवा. त्याला प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सांगा असा सल्ला संघ व्यवस्थापनाला आकाश चोप्राने दिला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टी20 मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना पार पडणार आहे. या सामन्यामध्ये आता कोणत्या खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार हा मालिकेचा शेवटचा सामना 1 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.