Team India Upcoming ODI Series : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज नुकतीच खेळवण्यात आली. या वनडे सीरिजमध्ये भारताने 3-1 ने आघाडी मिळवून विजय मिळवला. भारताचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा न्यूझीलंड दौरा ठरला. विराट आणि रोहित या दोघांनी टी20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. त्यामुळे आता ते फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळत असून ते पुन्हा कधी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. तेव्हा न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिजनंतर आता भारताची पुढील वनडे सीरिज कोणाविरुद्ध असणार? याविषयी माहिती करून घ्या.
विराट - रोहितचा परफॉर्मन्स राहिला थंड :
भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिज जिंकली खरी मात्र रोहित आणि विराट हे दोघे मोठ्या धावा करू शकले नाहीत, 5 सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून फक्त 1 अर्धशतक आलं तर रोहित शर्मा तर तेवढ्या धावा सुद्धा करू शकला नाही. रोहित आणि विराट या दोघांपैकी कोणी एकाने देखील सीरिजमध्ये 100 धावांचा आकडा पार केला नाही. मात्र फॅन्ससाठी आता आनंदाची बातमी हीच की रोहित आणि विराटला निळ्या जर्सीत पाहण्यासाठी आता त्यांना खूप वेळ वाट पाहावी लागणार नाही.
कधी खेळणार पुढील वनडे सीरिज?
डिसेंबर महिन्यात भारतात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळणार आहे. 2026 मधील भारताची ही शेवटची वनडे सीरिज होती. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे सीरिज 13 डिसेंबरपासून सुरू होईल. हे सामने विशाखापट्टणम, बेंगळुरू आणि अहमदाबाद येथे खेळवले जातील आणि तिन्ही सामने दुपारी 2 वाजता सुरू होतील. सीरिजमधील पहिला सामना १३ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथील एसीए व्हीडीसीए स्टेडियमवर होईल. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. सीरिजमधील शेवटचा सामना 19 डिसेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.
वनडे सीरिजनंतर टी20 सीरिज सुद्धा :
श्रीलंके विरुद्ध वनडे सीरीज संपल्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची टी20 सीरीज सुद्धा खेळणार आहे. हा सामना 22 ते 27 डिसेंबर दरम्यान आयोजित केला जाणार आहे. या टी20 सीरिजसह भारतीय पुरुष संघाचे 2026 सालचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक पूर्ण होईल. त्यानंतर, नवीन वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात भारतीय संघ झिम्बाब्वेचे यजमानपद भूषवेल. या दोन देशांदरम्यान 3 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत तीन वनडे सामने खेळवले जातील.