SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

न्यूझीलंड विरुद्ध सीरिज संपली, आता पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत कधी दिसणार रोहित - विराट? पाहा आगामी वनडे सीरिजचं शेड्युल

Team India Upcoming ODI Series : न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिजनंतर आता टीम इंडिया डिसेंबर महिन्यात आगामी वनडे सीरिज खेळणार आहे. त्यामुळे रोहित आणि विराटच्या फॅन्सला त्यांना पुन्हा निळ्या जर्सीत पाहण्यासाठी खूप महिने वाट पाहावी लागणार नाही.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 16, 2026, 12:57 PM IST | Updated: Nov 16, 2026, 01:42 PM IST
Image Credit: आता पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत कधी दिसणार रोहित - विराट?
Join

Team India Upcoming ODI Series : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज नुकतीच खेळवण्यात आली. या वनडे सीरिजमध्ये भारताने 3-1 ने आघाडी मिळवून विजय मिळवला. भारताचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा न्यूझीलंड दौरा ठरला. विराट आणि रोहित या दोघांनी टी20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. त्यामुळे आता ते फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळत असून ते पुन्हा कधी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. तेव्हा न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिजनंतर आता भारताची पुढील वनडे सीरिज कोणाविरुद्ध असणार? याविषयी माहिती करून घ्या.

विराट - रोहितचा परफॉर्मन्स राहिला थंड :

भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिज जिंकली खरी मात्र रोहित आणि विराट हे दोघे मोठ्या धावा करू शकले नाहीत, 5 सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून फक्त 1 अर्धशतक आलं तर रोहित शर्मा तर तेवढ्या धावा सुद्धा करू शकला नाही. रोहित आणि विराट या दोघांपैकी कोणी एकाने देखील सीरिजमध्ये 100 धावांचा आकडा पार केला नाही. मात्र फॅन्ससाठी आता आनंदाची बातमी हीच की रोहित आणि विराटला निळ्या जर्सीत पाहण्यासाठी आता त्यांना खूप वेळ वाट पाहावी लागणार नाही.

कधी खेळणार पुढील वनडे सीरिज?

डिसेंबर महिन्यात भारतात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळणार आहे. 2026 मधील भारताची ही शेवटची वनडे सीरिज होती. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे सीरिज 13 डिसेंबरपासून सुरू होईल. हे सामने विशाखापट्टणम, बेंगळुरू आणि अहमदाबाद येथे खेळवले जातील आणि तिन्ही सामने दुपारी 2 वाजता सुरू होतील. सीरिजमधील पहिला सामना १३ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथील एसीए व्हीडीसीए स्टेडियमवर होईल. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. सीरिजमधील शेवटचा सामना 19 डिसेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

हेही वाचा : भारताला अंडर-19 आशिया कपमध्ये चॅम्पियन बनवणाऱ्या मोहित उल्वाला लागली लॉटरी, वरिष्ठ संघात मिळाली संधी

वनडे सीरिजनंतर टी20 सीरिज सुद्धा :

श्रीलंके विरुद्ध वनडे सीरीज संपल्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची टी20 सीरीज सुद्धा खेळणार आहे. हा सामना 22 ते 27 डिसेंबर दरम्यान आयोजित केला जाणार आहे. या टी20 सीरिजसह भारतीय पुरुष संघाचे 2026 सालचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक पूर्ण होईल. त्यानंतर, नवीन वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात भारतीय संघ झिम्बाब्वेचे यजमानपद भूषवेल. या दोन देशांदरम्यान 3 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत तीन वनडे  सामने खेळवले जातील.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES