SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भुवनेश्वर कुमारला शेवटच्या सामन्यात संधी मिळणार, कशी असेल भारताची प्लेइंग 11?

ता पाचव्या सामन्यात मालिकेचा शेवटच्या सामन्यामध्ये भारत विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरतील. पाचव्या सामन्यामध्ये भारताचे कोच गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर प्लेइंग 11 मध्ये बदल करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 31, 2026, 10:13 PM IST | Updated: Oct 31, 2026, 10:38 PM IST
Join

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या चौथ्या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची त्याचबरोबर फलंदाजांची देखील निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने चौथ्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये काही महत्त्वाचे बदल केले होते. यामध्ये टीम इंडियाचा 36 वर्षांचा सर्वात अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला प्लेइंग 11 मधून वगळण्यात आले होते, तर वैभव सूर्यवंशी देखील बेंचवर होता. आता पाचव्या सामन्यात मालिकेचा शेवटच्या सामन्यामध्ये भारत विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरतील. पाचव्या सामन्यामध्ये भारताचे कोच गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर प्लेइंग 11 मध्ये बदल करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने भारतीय संघामध्ये 4 वर्षानंतर पुनरागमन केले पण तो या संधीचे सोने करु शकला नाही. त्याने खेळलेल्या या तीन सामन्यांमध्ये 139 च्या सरासरीने गोलंदाजी करुन फक्त एक विकेट घेतला. त्याला चौथ्या टी20 सामन्यामधून देखील वगळण्यात आले होते. जर भुवनेश्वर कुमारला अंतिम टी20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, तर त्याला चांगली गोलंदाजी करून स्वतःला सिद्ध करावे लागेल. जर तो असे करण्यात अपयशी ठरला, तर त्याला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेतून वगळले जाऊ शकते. आता भुवनेश्वर कुमारसाठी पुन्हा भारतीय संघाकडून खेळणे खूप कठीण होईल. 

हे ही वाचा

IND vs NZ शेवटच्या टी20 सामन्यात कोण मारणार बाजी? सामन्याची संपूर्ण माहिती वाचा एका क्लिकवर

इशान किशन दुखापतीमुळे कुमार कुशाग्रला संघामध्ये स्थान मिळाले होते पण त्याला एकही खेळण्याची संधी मिळालेली नाही. आतापर्यत चार सामने झाले पण वरुण चक्रवर्ती मागील चारही सामन्यांमध्ये बेंचवर बसला आहे, त्याला आतापर्यत एकही सामना खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही. परिणामी, कुमार कुशाग्रला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणे जवळपास अशक्य झाले आहे. संघ व्यवस्थापनाने कुशाग्रला 'इंडिया ए' संघाकडून खेळण्यासाठी पाठवले आहे. मात्र, भारतीय संघात या भूमिकेसाठी आधीच किशन आणि संजू सॅमसन आहेत. 

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज कुलदीप यादवला मागील काही काळापासून सातत्याने वगळले जात होते, त्याच्याबद्दल सांगायचे झाले तर त्याला मागील 9 सामन्यांमध्ये फक्त 2 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या चार सामन्यांमध्ये त्याला एकही संधी मिळाली नाही. अंतिम सामन्यातही तो खेळेल याची शक्यता फारच कमी वाटते. अशा परिस्थितीत, कुलदीप यादवला न खेळताच टी20 संघातून वगळले जाऊ शकते. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES