भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टी20 मालिकेचा शेवटचा आणि पाचवा सामना खेळवला जाणार आहे, या मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला होता. तर चौथ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता, आता मालिकेमध्ये सध्या स्थिती 3-1 अशी आहे. भारताकडे या मालिकेची अभेद्य आघाडी आहे, आता या मालिकेचा शेवटच्या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवण्याच्या उद्धेशाने मैदानात उतरतील. आता या मालिकेचा पाचवा आणि शेवटचा टी20 सामना क्रिकेट चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना रविवार, 1 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे, हॅमिल्टनमधील सेडन पार्क येथे या सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 12.30 वाजता सुरु होणार आहे तर या सामन्याच्या नाणेफेकीसाठी श्रेयस अय्यर आणि मिचेल सॅंटनर दोघेही मैदानात 12.00 वाजता येतील. भारतात, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी20 आंतरराष्ट्रीय सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. भारतीय चाहते सोनी स्पोर्ट्स चॅनेलद्वारे टीव्हीवर हा सामना थेट पाहू शकतात. याव्यतिरिक्त, तुम्ही भारत-न्यूझीलंड टी20 सामना डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य थेट पाहू शकता.
हे ही वाचा
मोबाईल आणि लॅपटॉप वापरकर्ते भारत-न्यूझीलंड 5 व्या टी20 सामन्याचे थेट प्रक्षेपण SonyLIV ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकतात. मात्र, SonyLIV वर सामना थेट पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शनची आवश्यकता असेल. भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बद्दल सांगायचे झाले तर चौथ्या सामन्यामध्ये टीम इंडियाने महत्त्वाचे बदल केले होते. या सामन्यात भारताच्या संघाने टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला प्लेइंग 11 मधून वगळण्यात आले होते. त्याच्या जागेवर मयंक यादवला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले होते.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 वैभव सूर्यवंशीला खेळवण्यात आले होते पण त्याला चौथ्या सामन्यातून वगळण्यात आले आणि त्यानंतर इशान किशनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले होते. आता पाचव्या सामन्यामध्ये कोणाला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.