• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /2019 नंतर काही जणांचा फोन थांबला, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याला जशास तसं उत्तर

2019 नंतर काही जणांचा फोन थांबला, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याला जशास तसं उत्तर

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. 2019 नंतर काही जणांचा फोन थांबला असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 31, 2026, 08:37 PM IST|Updated: Oct 31, 2026, 08:50 PM IST
joinshare
2019 नंतर काही जणांचा फोन थांबला, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याला जशास तसं उत्तर

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण, सिया आणि चेतनला पाहून काय म्हणाले उज्वल निकम? पहिल्याच सुनावणीत काय घडलं?

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण, सिया आणि चेतनला पाहून काय म्हणाले उज्वल निकम? पहिल्याच सुनावणीत काय घडलं?

2

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ट्रकमध्ये मागून घुसली कार, 1किमी नेलं फरफटत; कोर्टाने दिला मोठा निर्णय!

3

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा ऐतिहासिक शुभारंभ, 6500 आदिवासींच्या गोदा आरतीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड!

4

2019 नंतर काही जणांचा फोन थांबला, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याला जशास तसं उत्तर

5

IND vs NZ शेवटच्या टी20 सामन्यात कोण मारणार बाजी? सामन्याची संपूर्ण माहिती वाचा एका क्लिकवर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

उद्धव ठाकरे  : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहलेल्या   "बोध किर्तन" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच ज्येष्ठ पत्रकार लेखक अंबरीश  मिश्र यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी  उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याला जशास तसं उत्तर दिले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होतो?

'महाराष्ट्राची हास्यरेषा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच राजकीय फटकेबाजी केली होती. उद्धव ठाकरे यांचे नाव घेत देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी वक्तव्य केले होते. 2019 पर्यंत उद्धव जींनी बोलावले तेव्हा तेव्हा मी गेलो. पण त्यानंतर त्यांनी काही बोलावले नाही.  मी वाट पाहात राहिलो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.  काही जणांचा फोन 2019 सालानंतर थांबला तो थांबला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरेंची फटकेबाजी

राज ठाकरे बोलल्यावर मुख्यमंत्री येतात. त्यामुळे राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना बोलवत जावं, असं वक्तव्य मंत्री आशिष शेलारांनी केले. तर, 2029 पर्यंत मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं, असं म्हणत शेलारांच्या विधानावर राज ठाकरेंनी मिश्किल टोला लगावला होता.  संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी अनेक जुने किस्से सांगितले. तसेच संजय राऊत यांच्या लेखन शैलीचे कौतुक केले. शब्दांच्या ओव्या पण होतात आणि शिव्या पण होतात.  हे संजय यांनी बरोबर साधले आहे. शिव्या कोणाला द्यायच्या आणि ओव्या कोणाला द्यायच्या हे कळाले पाहिजे.

काही दिवसांनी अक्षर आणि पेन हे म्युझियम मध्ये जाईल. पूर्वी एक शब्द होता बाई वेडा तसा आता मोबाईल वेडा झालं आहे. तुमचा गैरसमज आम्ही वाचतो कमी आम्ही वाचवतो जास्तं आणि मग वाचणं राहून जात.  मराठी भाषिकांना नेमके काय पाहिजे हे अमरीश यांनी सांगितले.

मराठीचा आग्रह धरतो पण शुद्ध मराठी आली पाहिजे नाहीतर अर्थ काय त्याचा. ओव्याची सुरवात कुठून झाली  बोध देणार कोणी राहिले नाही. या पुस्तकात अनुक्रमणिका नाही. कोणतही पान कधीही काढा.
पूर्वी दळण जात्यावर दळलं जायचं. तेव्हा ओव्या निर्माण व्हायच्या. पण जात गेलं आणि जाती राहिल्या आणि जातीवादी शिव्या आल्या असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Uddhav Thackeray
Maharashtra Politics
Devendra Fadnavis