SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ग्लेन फिलिप्सचं ऐतिहासिक शतक, भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

IND VS NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज ग्लेन फिलिप्सने शतक ठोकलं आहे. यासह त्याने संकटात असलेल्या आपल्या संघाला तारलं आणि त्या सोबतच वर्ल्ड क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 20, 2026, 06:45 IST | Updated: Nov 20, 2026, 07:27 IST
Image Credit: ग्लेन फिलिप्स
Join

IND VS NZ :  भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना सध्या सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार ऑलराउंडर ग्लेन फिलिप्सने वेलिंगटनच्या बेसिन रिजर्व मैदानावर शतक ठोकून वर्ल्ड क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. एकाच वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताच्या विरोधात शतक ठोकणारा ग्लेन फिलिप्स जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी ग्लेन फिलिप्सने 18 जानेवारी 2026 रोजी भारताविरुद्धच्या वनडे सामन्यात शतक ठोकले होते आणि त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी त्याने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही शतक नोंदवले. आता वेलिंग्टन टेस्टच्या पहिल्या डावात शतक पूर्ण करून त्याने या ऐतिहासिक कामगिरीवर आपली मोहोर उमटवली आहे.

अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा खेळाडू :

एका कॅलेंडर वर्षात एकाच संघाविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा ग्लेन फिलिप्स हा जागतिक क्रिकेटमधील केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा अनोखा विक्रम केवळ भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावावर होता. ज्यांनी 2017 मध्ये श्रीलंकाविरुद्ध टेस्ट वनडे आणि टी20 अशा तिन्ही प्रकारांत शतके झळकावली होती. दरम्यान ग्लेन फिलिप्स हा एकाच देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतक ठोकणारा पहिला न्यूझीलंडचा फलंदाज ठरला आहे.

शेन वॉटसन आणि शाई होप यांच्यानंतर, भारताच्या विरोधात तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. ग्लेन फिलिप्सच्या टेस्ट कारकिर्दीतील हे दुसरे शतक असून, या खेळीदरम्यान त्याने इतरही अनेक टप्पे गाठले आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी फिलिप्सने टेस्ट क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठला. त्याने आतापर्यंत 20 सामन्यांच्या 34 डावांमध्ये 38.35 च्या सरासरीने एकूण 1074 धावा केल्या आहेत.

हेही वाचा : IPL सोडल्यानंतर धोनीला किती रुपये पैन्शन मिळेल? BCCI च्या पेन्शनचा नियम घ्या जाणून!

न्यूझीलंडचा डाव सावरला :

पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी जेव्हा न्यूझीलंड संघाने 70 धावांवर 5 विकेट गमावून संकटात सापडली होती. तेव्हा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या फलंदाजाने ग्लेन फिलिप्सने सहाव्या विकेटसाठी 216 धावांची चांगली पार्टनरशिप केली. ज्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजीची सुरुवात खराब झालेली असताना सुद्धा ते यात यशस्वी झाले. पहिल्या दिवसाच्या अखेरीस 94 धावांवर नाबाद असलेला फिलिप्स दुसऱ्या दिवशीही आपली खेळी सुरू ठेवत 194 बॉलमध्ये शतकापर्यंत पोहोचला. त्याने 216 बॉलमध्ये 14 चौकारांच्या मदतीने 118 धावांची जिद्दी खेळी साकारली, मात्र 94 व्या ओव्हरमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप याने त्याला क्लीन बोल्ड केले.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES