हर्षित राणा पाकिस्तानच्या फलंदाजांशी भिडला, पंचाना करावा लागला हस्तक्षेप! पहा Video
भारत पाकिस्तान सामन्यामध्ये हर्षित राणा त्याच्या आक्रमक गोलंदाजीमुळे त्याचबरोबर मैदानावरील आक्रमक वावर त्याचा पाहायला मिळला. जेव्हा भारत संकटात आहे असे हर्षित राणाला समजल्यानंतर खेळाडू पाकिस्तानच्या फलंदाजांशी भिडला.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु झालेल्या एकदिवसीय इमर्जिंग आशिया कप 2026 च्या ग्रुप स्टेज सामन्यामध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने चांगली कामगिरी आणि भारतासमोर 314 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. या सामन्यामध्ये भारताच्या गोलंदाजासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये हर्षित राणा त्याच्या आक्रमक गोलंदाजीमुळे त्याचबरोबर मैदानावरील आक्रमक वावर त्याचा पाहायला मिळतो. जेव्हा भारत संकटात आहे असे हर्षित राणाला समजल्यानंतर खेळाडू पाकिस्तानच्या फलंदाजांशी भिडला.
भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाने आपली आक्रमकता दाखवत पाकिस्तानी फलंदाजांना फटकारले. हर्षितने आपल्या आक्रमकतेने सामन्याची उत्कंठा वाढवली आणि भारताच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. यादरम्यान, त्याचा पाकिस्तानी सलामीवीर शमीम हुसेनसोबतही वाद झाला. मैदानावर या दोन खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाल्याचे दिसून आले. पाकिस्तानचा सलामीवीर शमिल हुसेनने डावाच्या सुरुवातीला अनेक मोठे फटके लगावले. त्याने हर्षित राणा आणि प्रिन्स यादव यांच्याविरुद्ध चौकार आणि षटकारही मारले. सातव्या षटकात, हर्षित राणाने मेजर सदाकत आणि शमिल हुसेन यांना चिथावणी दिल्याचे दिसले.
हे ही वाचा
भारतासमोर पाकिस्तानचे मोठे आव्हान, टीम इंडियाला विजयासाठी 314 धावांची गरज!
सदाकतने फारशी प्रतिक्रिया दिली नाही, पण शमिल हर्षितशी बोलला, ज्यामुळे पंचांना हस्तक्षेप करावा लागला. त्याने या घटनेबद्दल कर्णधार तिलक वर्मा यांच्याशीही संवाद साधला. मात्र, हर्षित थांबला नाही आणि प्रत्येक चेंडूनंतर पाकिस्तानी फलंदाजांशी बोलताना दिसला. पुढच्याच षटकात, आयुष बडोनीने शामिलला जाळ्यात अडकवून भारताला पहिले यश मिळवून दिले. हर्षित राणाने शामिलचा झेल घेतला, ज्याने त्याला मैदान सोडण्याचा इशारा करून आनंद साजरा केला. हर्षितकडून पाकिस्तानी फलंदाजांना सतत चिथावणी दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात पाकिस्तान 'अ' संघाकडून खेळताना शामिलने 23 चेंडूंमध्ये चार चौकार आणि दोन षटकारांसह 33 धावा केल्या.
भारत अ संघाची प्लेइंग
– वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विप्राज निगम, हर्षित राणा आणि प्रिन्स यादव.