IND vs NEP : तिलक-कुशाग्रसमोर नेपाळचे फलंदाज हतबल! नेपाळसमोर 333 धावांचे लक्ष्य
इमर्जिंग आशिया कप 2026 च्या मोहिमेला भारताच्या संघाने आजपासून सुरुवात केली, संघाचा कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्रने शतके झळकावली. या सामन्यामध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पहिले तीन विकेट्स गमावल्यानंतर तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांनी संघासाठी कमालीची कामगिरी केली. भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत पहिल्या डावामध्ये तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांच्या खेळीमुळे नेपाळचा संघ मैदानावर पूर्णपणे दोन्ही फलंदाजांसमोर हतबल पाहायला मिळाला. कुमार कुशाग्र आणि संघाचा कर्णधार तिलक वर्मा यांच्या खेळीसमोर नेपाळचा संघाने गुडघे टेकले होते. भारताचा संघ या सामन्यामध्ये विजय मिळवण्याच्या इराद्यामध्ये आहे. ज्याप्रकारे भारतीय संघाची फलंदाजी पाहायला मिळाली, त्याचबरोबर टीम इंडियामध्ये हर्षित राणा, प्रिन्स यादवसारखे गोलंदाज संघामध्ये आहेत. पहिल्या डावामध्ये संघाने कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर वाचा.
कुमार कुशाग्रचे शतक
भारत अ संघाचा स्टार फलंदाज कुमार कुशाग्रने आज त्याची शैली दाखवली आणि संघासाठी मोठी खेळी कठीण काळामध्ये खेळली. कुमार कुशाग्रने आजच्या सामन्यामध्ये 102 चेंडूमध्ये 112 धावा केल्या, यामध्ये त्याने 5 षटकार आणि 10 चौकार मारले. कुमार कुशाग्रने संघासाठी 93 चेंडूमध्ये शतक झळकावले, त्याच्या या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हे ही वाचा
आर्यवीरची आयपीएलमध्ये होणार एंट्री! वीरेंद्र सेहवागने स्वत: केला खुलासा
तिलक वर्माने ठोकले नेपाळविरुद्ध शतक
भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा देखील आजच्या सामन्यामध्ये कमालीच्या फॅार्ममध्ये पाहायला मिळाला. तिलक वर्माने नेपाळविरुद्ध शतक झळकावले, त्याने आजच्या सामन्यामध्ये 113 चेंडूमध्ये 107 धावा केल्या. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्या या कामगिरीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचे योगदान मिळाले.
भारताचे सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी दोन्ही फलंदाज पूर्णपणे फेल झाले. अभिषेक शर्माने संघासाठी 13 चेंडूमध्ये 9 धावा केल्या.