SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टी20 नंतर वनडेतही टीम इंडिया न्यूझीलंडला देणार दणका? कशी असणार भारताची प्लेईंग 11?

IND VS NZ ODI 1st Playing 11 : टी20 नंतर आता भारतीय संघ वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड विरुद्ध मैदानात उतरणार आहे. वनडे सीरिजसाठी भारतीय संघात अनेक बदल आहेत. तेव्हा 4 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यात कर्णधार शुभमन गिल कोणत्या खेळाडूला टीम इंडियाच्या प्लेईंग 11मध्ये संधी देतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 03, 2026, 09:59 PM IST | Updated: Nov 03, 2026, 10:22 PM IST
Image Credit: IND VS NZ वनडे सामन्यात कशी असणार भारताची प्लेईंग 11?
Join

IND VS NZ ODI 1st Playing 11 : 4 नोव्हेंबर पासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या वनडे सीरिज मधील पहिला सामना खेळवला जाणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड विरुद्ध झालेली 5 सामन्यांची टी20 सीरिज ही टीम इंडियाने 3-2 ने आघाडी घेऊन जिंकली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा वनडे फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडला पराभवाचा दणका देण्यासाठी भारताचा वनडे संघ मैदानात उतरेल. टीम इंडियाच्या संघात यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावाचा समावेश आहे. तेव्हा 4 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असू शकते? याविषयी जाणून घेऊयात.

कोण कोण असणार प्लेईंग 11 मध्ये?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिल सह विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं स्थान निश्चित आहे. रोहित आणि शुभमन हे दोघे ओपनिंग करतील तर विराट हा नंबर तीन वर फलंदाजीसाठी उतरेल. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरचं  खेळणं निश्चित असून विकेटकिपरसाठी भारताकडे दोन पर्याय आहेत. यात पहिला पर्याय हा केएल राहुल आणि तर दुसरा पर्याय हा ईशान किशन आहे. ईशान किशनला पहिल्या सामन्याच्या प्लेईंग ११ मध्ये संधी मिळू शकते. नितीश कुमार रेड्डी आणि अक्षर पटेल यांचे खेळणे निश्चित मानले जात आहे. नमन धीर हा आणखी एक पर्याय आहे. त्याने टी २० सीरिजमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. परंतु संघ त्याला संधी दिली जाईल असं वाटत नाही. स्पिनरमध्ये भारताची पहिली पसंती ही कुलदीप यादव असेल. तर वेगवान गोलंदाज म्हणून सर्वांचं लक्ष हे मोहम्मद सिराजवर असेल. जर सिराज उपलब्ध नसेल तर त्याच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करेल. गुरनूर ब्रार आणि अंशुल कंबोज हे इतर दोन गोलंदाज असतील.

वनडे सीरिजचं वेळापत्रक :

पहिला सामना 4 नोव्हेंबर  
दुसरा सामना  7 नोव्हेंबर 
तिसरा सामना 10 नोव्हेंबर 
चौथा सामना 13 नोव्हेंबर 
पाचवा सामना 15 नोव्हेंबर

भारताची संभाव्य प्लेईंग 11 :

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी,अक्षर पटेल, कुलदीप यादव,अर्शदीप सिंह, अंशुल कंबोज, गुरनूर बरार

वनडे सीरिजसाठी संघ :

भारतीय संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, नमन धीर, औकिब नबी, रुतुराज गायकवाड, ईशान किशन.

न्यूझीलंड संघ :

हेन्री निकोल्स, विल यंग, ​​टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, जेकब डफी, नॅथन स्मिथ, मॅथ्यू फिशर, ब्लेअर टिकनर, टिम सायफर्ट, काइल जेमिसन

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES