SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या वनडेत पाऊस खेळ बिघडवणार? काय आहे हवामानाचा अंदाज?

IND VS NZ 2nd ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजमधील दुसरा वनडे सामना हा वेलिंगटनच्या हेनरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तेव्हा दुसऱ्या सामन्यात हवामान कसं असेल आणि पावसाची शक्यता आहे का? याविषयी माहिती जाणून घेऊयात.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 06, 2026, 03:08 PM IST | Updated: Nov 06, 2026, 03:51 PM IST
Image Credit: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या वनडेत पाऊस खेळ बिघडवणार? काय आहे हवामानाचा अंदाज?
Join

IND VS NZ 2nd ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना हा 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने 5 विकेटने विजय मिळवलेला होता. आता दुसरा वनडे सामना हा वेलिंगटनच्या हेनरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यावर सुद्धा पावसाचं सावट आहे, तेव्हा शनिवारी होणाऱ्या भारत - न्यूझीलंड सामन्याबाबत हवामानाचा अंदाज कसा आहे याविषयी जाणून घेऊयात.

वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया सध्या 1-0 च्या आघाडीने पुढे आहे. ऑकलँडमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडे सामन्यात पावसामुळे सामना उशिरा सुरु झाला. DLS पद्धतीच्यानुसार टीम इंडियाला 143 सामन्यांचं लक्ष देण्यात आलं होतं. ज्याला भारताने 22.4 ओव्हरमध्ये 5 विकेटने आघाडी घेऊन जिंकलं होतं.

कसं असणार हवामान?

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचं सावट असून शुक्रवारी वेलिंगटनमध्ये पावसामुळे न्यूझीलंड संघाला त्यांचा सराव हा चार भिंतीच्या मध्ये करावा लागला. तर टीम इंडियाचं सराव सत्र हे पावसामुळे रद्द करण्यात आलं आणि खेळाडू हे हॉटेलमध्येच थांबले. एक्यूवेदरनुसार शनिवारी वेलिंगटनमध्ये  60 टक्के पावसाची शक्यता आहे. न्यूझीलंडच्या वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होणार आहे. त्या वेळीही पावसाची 60 टक्के शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार, संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यान पावसाची शक्यता सर्वात कमी आहे. मात्र या काळातही हलक्या पावसामुळे खेळात व्यत्यय येऊ शकतो. फक्त पाऊसच नाही तर वेलिंग्टनमध्ये केवळ पाऊसच पडेल असे नाही, तर तिथे थंडी आणि 25 किमी/तास वेगाचे जोरदार वारेही वाहू शकतात. सामना रद्द होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

हेही वाचा : IND vs NZ: संपूर्ण सीरिजमधून बाहेर पडला स्टार फलंदाज, प्रॅक्टिस दरम्यान झालेली दुखापत, संघाचं टेन्शन वाढलं
 

वेलिंगटन कसा आहे हेड टू हेड रिकॉर्ड :

वेलिंगटन हेनरी स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 4 वनडे सामने खेळवले गेलेत. सामन्यांपैकी दोन वेळा भारतीय संघ विजयी ठरला आहे. तर एकदा न्यूझीलंडने विजय मिळवला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. या मैदानावर त्यांच्यातील शेवटची लढत 2019 मध्ये झाली होती, ज्यामध्ये भारतीय संघ 252 धावांत बाद झाला होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत न्यूझीलंडला 217 धावांत गुंडाळले आणि आपल्या संघासाठी 35 धावांनी विजय मिळवून दिला.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES