'माझं काम सर्वांना खुश करणं नाही...' हेड कोच गौतम गंभीर असं का म्हणाला? नेमकं काय घडलं?
IND VS NZ T20 Series : भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या सामन्याच्या सुरुवातीला हेड कोच गौतम गंभीरला विचारण्यात आलं की एवढ्या मोठ्या संघाला मॅनेज आणि सर्व खेळाडूंना खुश कसे ठेवतो? यावर त्याने दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा आहे.
IND VS NZ T20 Series : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामान्यांची टी20 सीरिज खेळवण्यात आली. या सीरिजमधील शेवटचा पाचवा सामना हा 1 नोव्हेंबर रोजी खेळवला जात असून यापूर्वी झालेल्या पहिल्या तीन सामन्यात भारताने तर चौथ्या सामना हा न्यूझीलंडने जिंकला. पाचव्या सामन्याच्या सुरुवातीला भारताचा हेड कोच असणाऱ्या गौतम गंभीरला प्रश्न विचारण्यात आला की तो एवढ्या मोठ्या संघाला मॅनेज आणि सर्व खेळाडूंना खुश कसे ठेवतो? यावर गौतम गंभीरने अगदी थेट उत्तर दिलं ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय म्हणाला गौतम गंभीर?
हेड कोच गौतम गंभीरने प्रश्नाच उत्तर देताना म्हटलंन की, 'आधी सांगायचं तर माझं काम हे सर्वांना खुश ठेवणं नाहीये. माझे काम योग्य निर्णय घेणे हे आहे, लोकप्रिय निर्णय घेणे नव्हे. म्हणूनच मी इथे आहे. मला असं वाटतं की, सोशल मीडियाच्या या युगात, जिथे खूप जास्त चर्चा होत असते, तिथे लोकप्रिय निर्णय घेणे अत्यंत सोपं असतं'.
गौतम गंभीरचं हे वक्तव्य अशावेळी आलं जेव्हा वैभव सूर्यवंशीला प्लेईंग 11 चा नियमित खेळाडू बनवण्याची मागणी होत होती. मात्र मॅनेजमेंटने सांगितलंय की वैभवला त्याच्या संधीची वाट पाहावी लागेल. याचे कारण असे की भारतीय ओपनर्स सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. दरम्यान चौथ्या टी20 सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारला बाहेर बसवण्याचा अचानक घेतलेला निर्णयही चर्चेचा विषय ठरलाय.
हेही वाचा : 'मी तुला माझ्या पत्नी सोबत...', LIVE मॅचमध्ये स्टार क्रिकेटरला मिळाली अश्लील ऑफर, Video Viral
खासकरून टी20 संघात असं पाहायला मिळतंय की फलंदाजीच्या ऑर्डरमध्ये लागोपाठ बदल होत आहेत. ईशान किशन पासून ते अक्षर पटेल आणि तिलक वर्मा सुद्धा कधी वरच्या क्रमांकावर तर कधी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करतात. याचा परिणाम हा लयीवर सुद्धा होतोय. वैभव सूर्यवंशीला या सीरिजमध्ये दोनद संधी मिळाली. दुसऱ्या टी20 सामन्यात तो केवळ 4 धावा काढून बाद झाला. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याने 19 बॉलमध्ये 45 धावांची धडाकेबाज खेळी करत भारतीय संघाला एक उत्कृष्ट सुरुवात करून दिली.