न्यूझीलंडला क्लीन स्विप देण्याचं स्वप्न भंगलं, भारताचा चौथ्या सामन्यात 87 धावांनी पराभव
IND VS NZ T20 : पाच सामन्यांच्या टी20 सीरिजमधील सुरुवातीचे तीनही सामने जिंकून आता उर्वरित सामन्यात सुद्धा बाजी मारून न्यूझीलंडला टी20 सीरिजमध्ये क्लीन स्वीप देण्याचं भारताचं लक्ष होतं. मात्र न्यूझीलंडने अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजी करून चौथ्या सामन्यात 87 धावांनी भारतावर विजय मिळवला.
IND VS NZ T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी20 सीरिजचा चौथा सामना खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय फलंदाजांना घाम फोडला आणि 87 धावांनी विजय मिळवत चौथा सामना जिंकला. पाच सामन्यांच्या टी20 सीरिजमध्ये भारताने सुरुवातीचे तीन सामने जिंकले होते, त्यामुळे उर्वरित दोन सामने जिंकून न्यूझीलंडला टी20 सीरिजमध्ये क्लीन स्वीप देण्याचं भारताचं लक्ष होतं. मात्र न्यूझीलंडने ते पूर्ण होऊ दिलं नाही आणि चौथा सामना जिंकून सीरिजमध्ये 1-3 ने कमबॅक केलं.
पहिले फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 259 धावा केल्या. तर भारतीय संघ ही फलंदाजी दरम्यान केवळ 172 धावा करू शकली. न्यूझीलंडच्या विजयाचा हिरो ग्लेन फिलिप्स ठरला होता. त्याने तब्बल 49 बॉलमध्ये 107 धावा केल्या. त्याच्या शिवाय मायकल ब्रेव्हिसने 25 बॉलमध्ये 65 धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांनी 40 बॉलमध्ये 115 धावांची पार्टनरशिप केली. टीम इंडियाच्या फलंदाजांना 7 विकेट घेण्यात यश आले. यात मयांक यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर अक्षर पटेल प्रिन्स यादव, नितीश कुमार रेड्डी आणि अर्शदीपसिंहने प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा : सेहवाग आणि द्रविडच्या मुलांना मिळालं टीम इंडियात स्थान, 'या' खेळाडूला मिळालं कर्णधारपद
टीम इंडियाची खराब फलंदाजी :
भारताची विस्फोटक फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजी समोर गडगडली. संजू सॅमसन खूप लवकर बाद झाला. त्यानंतर ईशान किशनने सुद्धा स्वस्तात विकेट गमावली. अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरने विकेटवर जम बसवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे प्रयत्न मात्र पॉवर प्लेमध्ये संपले. मॅथ्यू फिशरने अभिषेक शर्माला 27 धावांवर बाद केले, तर 11 बॉलवर 22 धावा करणारा कर्णधार अय्यर ॲडम मिल्नेच्या ओव्हरमध्ये बाद झाला.
अक्षर पटेलने सुद्धा 7 धावा करून विकेट गमावली. नितीश कुमार रेड्डीने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु 21 धावा केल्यानंतर तो सँटनरच्या गोलंदाजीवर बाद झाला. नमन धीरनेही जलद फलंदाजी करत 13 बॉल 28 धावा केल्या, मात्र त्यानंतर तो जेकब डफीच्या गोलंदाजीवर बाद झालाउपकर्णधार तिलक वर्माने मैदानात टिकून फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो 35 धावांवर ऑल आउट झाला.