Asia Cup : भारत - पाकिस्तान सामना रद्द, पाकच्या क्रिकेट संघाला मिळाली ट्रॉफी, खेळाडूंनी टीम इंडियाला डिवचण्यासाठी केलं प्लेन क्रॅश सेलिब्रेशन
IND VS PAK Blind Asia Cup 2026 : पुरुष ब्लाइंड क्रिकेट आशिया कप 2026 च्या फायनलमध्ये पावसामुळे भारत - पाकिस्तान फायनल सामना रद्द झाला. त्यानंतर पाकिस्तान संघाला विजयी घोषित करून त्यांना विजेतेपदाची ट्रॉफी सुपूर्द करण्यात आली.
IND VS PAK Blind Asia Cup 2026 : पुरुष ब्लाइंड क्रिकेट आशिया कप 2026 च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शुक्रवारी अंतिम सामना खेळवला जाणार होता. मात्र ढाका येथे पावसाची संततधार सुरूच राहिल्याने सामन्याचा टॉस सुद्धा होऊ शकला नाही. त्यानंतर चांगल्या रन रेटच्या आधारे पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आले आणि त्यांना विजेतेपदाची ट्रॉफी सुद्धा सुपूर्द करण्यात आली. मात्र टीम इंडियाने या निर्णयाचा विरोध केला आणि ट्रॉफी सेरेमनीवर बहिष्कार टाकला. या सगळ्यानंतर पाकिस्तानच्या ब्लाइंड खेळाडूंनी विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारताना भारताला डिवचणारे सेमीब्रेशन केले. त्यांनी प्लेन क्रॅशचं सेलिब्रेशन केलं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेट रन रेटच्या आधारावर घेतला गेला निर्णय :
माध्यमांशी बोलताना क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाचे सचिव शैलेंद्र यादवने सांगितलं की, 'या वादावर जोपर्यंत कोणता तोडगा काढला जात नाही. तोपर्यंत भारताचा ब्लाइंड संघ हा पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार नाही. रिपोर्ट्सनुसार WBCC च्या टेक्निकल कमिटीने फायनल रद्द झाल्यावर भारत आणि पाकिस्तानला संयुक्त विजयी घोषित करण्यात सहमती दर्शवली होती.
मात्र वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेट काउंसिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट काउंसिलचे प्रमुख सुलतान शाहवर समितीचा निर्णय पलटवण्याचा आरोप आहे. ज्यांनी रेफरीला निर्देश दिले आणि पाकिस्तान संघाला चॅम्पियन घोषित करण्यात आले. हा निर्णय नेट रन रेटच्या आधारावर घेतला गेला ज्यात पाकिस्तानचा संघ हा भारताच्या पुढे होता.
हेही वाचा : हार्दिक पांड्याच्या येण्याने पंजाब किंग्सला कसा होणार फायदा? काय म्हणाला कोच रिकी पॉन्टिंग?
नेट रन रेटच्या आधारावर पाकिस्तानला चॅम्पियन बनवल्यामुळे भारतीय संघाने नाराजी व्यक्त केली. भारतीय संघाचं म्हणणं होतं की नेट रन रेटने विजेता ठरवण्याचा निर्णय हा जर फायनल सामना पावसामुळे रद्द झाला तर त्यासाठी लागू होत नाही. रिपोर्ट्समध्ये एका अधिकाऱ्याने फायनल सामन्यासाठी कोणताही रिझर्व डे नाही याबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित केला. अधिकाऱ्याने म्हंटलं की, 'कोणत्याही स्पर्धेत अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस असतो. अन्यथा दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाते. पात्रता फेरीसाठी 'नेट रन रेट'चा विचार केला जातो, परंतु अंतिम सामन्यासाठी तो विचारात घेतला जात नाही'.
पाकिस्तान ब्लाइंड संघाचं वादग्रस्त सेलिब्रेशन :
पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी विजेतेपदाची ट्रॉफी उंचावल्यावर ज्याप्रकारे सेलिब्रेशन केलं त्याच्यावर सध्या टीका केली जात आहे. खेळाडूंनी ट्रॉफी उंचावल्यावर प्लॅन क्रॅश केल्या सारखा इशारे केले. ऑपरेशन सिंदूर सुरु असताना पाकिस्तानने खोटं पसरवलं होतं की पाकिस्तानला भारतीय विमान पाडण्यात यश आलं. मात्र या दाव्यात कोणतेही तथ्य नव्हतं. मात्र तरी देखील पाकिस्तानचे खेळाडू अनेक स्पर्धांमध्ये भारताला डिवचण्यासाठी अशा प्रकारचे इशारे करतात.