दिल्लीच्या वायुप्रदूषणा समोर BCCI ही नमलं, भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सामन्याचं ठिकाण बदललं
IND VS SL ODI : भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सीरिजच्या पहिल्या सामन्याचं ठिकाण बदललं आहे. 13 डिसेंबर रोजी होणार सामना हा आधी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार होता. मात्र आता वायू प्रदूषणामुळे हे ठिकाण बदललं आहे.
IND VS SL ODI : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयला अखेर दिल्लीच्या वायू प्रदूषणासमोर झुकावं लागलं. डिसेंबरमध्ये श्रीलंका संघ वनडे सीरिजसाठी भारत दौऱ्यावर करणार आहे. याची सुरुवात 13 डिसेंबर रोजी वनडे सीरिज सह होईल. पहिला वनडे सामना हा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार होता. होती, परंतु आता ती विशाखापट्टणमला हलवण्यात आला आहे.
बीसीसीआयने पत्रात काय म्हंटलं?
बीसीसीआयने गुरुवारी 5 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या या बदलाची अधिकृत माहिती शेअर केली. काही दिवसांपूर्वी दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला त्यांच्या ठिकाणात बदल करण्याची मागणी केली होती. प्रेस रिलीजमध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिल्लीतील हवा प्रदूषण आणि स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे दिल्ली क्रिकेट बोर्डाने बदल करण्याची विनंती केली होती.
भारतीय बोर्डाने रिलीजमध्ये लिहिले की, 'दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाच्या विनंतीवर भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. हवामानामुळे उद्भवू शकणारे संभाव्य अडथळे आणि स्टेडियमसाठी प्रस्तावित नूतनीकरणाचे काम लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता हा सामना 13 डिसेंबर 2026 रोजी विशाखापट्टनम येथील एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल'.
हेही वाचा : माजी हॉकी कर्णधार एमएम सोमय्याच्या घरी चोरी, ऑलम्पिकचं सुवर्णपदक केलं लंपास, शोधासाठी विशेष पथक तैनात
भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सीरिज :
रविवार, 13 डिसेंबर 2026 - दुपारी 2:00 वाजता - पहिला सामना (ठिकण - विशाखापट्टणम )
बुधवार, 16 डिसेंबर 2026 - दुपारी 2:00 वाजता — दूसरा वनडे (ठिकण -बंगळुरू)
शनिवार, 19 डिसेंबर 2026 - दुपारी 2:00 वाजता — तीसरा वनडे (ठिकण - अहमदाबाद)
मंगलवार, 22 डिसेंबर 2026 - संध्याकाळी 7:00 वाजता — पहिला टी20 (ठिकण -राजकोट)
गुरुवार, 24 डिसेंबर 2026 - संध्याकाळी 7:00 वाजता — दूसरा टी20 (ठिकण - कटक)
रविवार, 27 डिसेंबर 2026 - संध्याकाळी 7:00 वाजता — तीसरा टी20 (ठिकण - पुणे)