SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अर्जुन राजपूतचं शतक व्यर्थ, पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा 3 विकेट्सने पराभव

भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या संघाने भारताला 3 विकेट्सने पराभूत केले आहे आणि यासह आता संघाने सेमीफायनलमध्ये देखील प्रवेश केला आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 08, 2026, 18:03 IST | Updated: Nov 08, 2026, 18:44 IST
Join

भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया कपमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते. या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे, या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या कमकुवत फलंदाजीमुळे टीम इंडियाचा कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय टीम इंडियाला चांगलाच महागात पडला. भारताच्या संघाने या सामन्यामध्ये फलंदाजी करत पहिल्या डावामध्ये फक्त 208 धावा केल्या. हे लक्ष्य पाकिस्तानच्या संघाने पार केले आणि विजय मिळवला. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने टीम इंडियाला 3 विकेट्सने पराभूत केले आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा. 

भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर भारताचा अंडर 19 संघाचा कर्णधार लक्ष्य रायचंदानी याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अर्जुन राजपूतने 85 चेंडूंमध्ये 107 धावा करून संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याव्यतिरिक्त, इतर कोणत्याही फलंदाजाने लक्षणीय प्रभाव पाडला नाही. भारताचा कर्णधार दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला आणि त्यानंतर टीम इंडियावर प्रभाव पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पाडला. वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागने काही वेळासाठी खेळी सांभाळली पण तो मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याने 22 धावा केल्या आणि विकेट गमावली. 

हे ही वाचा

आशिया कपसाठी भारतीय संघात मोठा फेरबदल... रजत पाटीदार बाहेर, 'या' अनुभवी खेळाडूला मिळाले संघात स्थान

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला व्ही. के. विनीतही अवघ्या 8 धावांवर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या यशवर्धन चौहानला केवळ 1 धाव करता आली. भारताने अवघ्या 22 धावांत तीन गडी गमावले. चौहानची विकेट पडल्यानंतर अर्जुन राजपूत फलंदाजीसाठी आला. भारतीय फलंदाज दबावाखाली असताना, अर्जुन राजपूतने पहिल्याच चेंडूपासून पाकिस्तानी गोलंदाजांवर दबाव टाकायला सुरुवात केली. अर्जुनने अन्वय द्रविडसोबत पाचव्या विकेटसाठी ४४ धावा जोडल्या, ज्यात अन्वयचे योगदान केवळ १० धावांचे होते. त्यानंतर राजपूतने मनाल चौहानसोबत सहाव्या विकेटसाठी 55 चेंडूंमध्ये 64 धावांची भागीदारी केली. त्या 64 धावांपैकी 50 धावा अर्जुनने केल्या. त्याने ८० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले.

पाकिस्तानच्या संघासाठीहमजा झहूरने कमालीची खेळी खेळली आणि  हमजाने पाकिस्तानला विजय मिळवून दिला. त्याने हसनेन अब्बाससोबत (67 चेंडूंत 38 धावा, दोन चौकार) सहाव्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी ३८ व्या षटकात संपुष्टात आली. हमजाने १०८ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES