SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेनंतर टीम इंडिया मायदेशात खेळणार सिरीज, वाचा संपूर्ण वेळापत्रक!

न्यूझीलंडविरुद्ध दौरा झाल्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळणार आहे, या मालिकेचे आयोजन हे भारतामध्ये केले जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक या लेखामध्ये सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 26, 2026, 09:00 IST | Updated: Nov 26, 2026, 10:20 IST
Join

भारताच्या संघाचा आता न्यूझीलंड दौऱ्याचा शेवटचा कसोटी सामना शिल्लक आहे, टीम इंडिया त्यानंतर कोणती मालिका खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना हा 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर यादरम्यान खेळवला जाणार आहे. या कसोटी सामना झाल्यानंतर टीम इंडियाचा परदेश दौरा संपणार आहे आणि त्यानंतर मायदेशामध्ये भारताचा संघ मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध दौरा झाल्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळणार आहे, या मालिकेचे आयोजन हे भारतामध्ये केले जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक या लेखामध्ये सविस्तर वाचा.

आगामी एकदिवसीय विश्वचषकाची सर्व संघ तयारी करत आहेत, नुकत्याच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताच्या संघाने बाजी मारली. टीम इंडिया आता श्रीलंकेविरुद्ध मालिकेला एकदिवसीय मालिकेपासून सुरुवात करणार आहे. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेला सुरुवात भारतामध्ये 13 डिसेंबर रोजी खेळवली जाणार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिका

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात 13 डिसेंबर रोजी होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना हा ACA-VDCA क्रिकेट स्टेडियम, पोटीनमल्लय्यापलेम येथे खेळवला जाणार आहे. दुसरा सामना हा या मालिकेचा बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. 16 डिसेंबर रोजी या हा सामना खेळवला जाणार आहे आणि श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेचा तिसरा सामना हा 19 डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. ODI मालिकेचा शेवटचा सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

हे ही वाचा

आर्यवीरवर कोणते संघ लावणार बोली? सेहवागच्या मुलाला 'या' फ्रन्चायझी बनवू शकतात करोडपती

भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेचे वेळापत्रक

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे, ही मालिका एकदिवसीय मालिका संपल्यानंतर खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना हा 22 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे, या सामन्याचे आयोजन गुजरातमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरा आणि तिसरा सामना हा अनुक्रमे 24 डिसेंबर आणि 27 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दुसरा सामना हा कटाका येथे बाराबती स्टेडियमवर होणार आहे तर तिसरा सामना हा गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES