SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आशियाई खेळांमध्ये इशान किशनची ऐतिहासिक कामगिरी, युवराज सिंगला टाकलं मागे!

सुरुवातीला भारताचा संघ अडचणीमध्ये सापडला होता. त्यानंतर टीम इंडियाने दमदार कमबॅक केला, या सामन्यामध्ये इशान किशनने कमालीची खेळी खेळली आणि रेकॅार्ड नावावर केला.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 01, 2026, 05:04 PM IST | Updated: Oct 01, 2026, 05:23 PM IST
Join

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आशियाई खेळाचा सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने एकतर्फी विजय मिळवला आणि फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यामध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक फार काही करु शकले नाही पण त्यानंतर इशान किशनने कठीण खेळपट्टीवर भारतीय संघासाठी कमालीची कामगिरी केली. इशान किशनने संघासाठी 80 धावांची नाबाद खेळी खेळली, सुरुवातीला भारताचा संघ अडचणीमध्ये सापडला होता. त्यानंतर टीम इंडियाने दमदार कमबॅक केला. भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 169 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाला भारताने 45 धावांवर सर्वबाद केले. या सामन्यात इशान किशनने नवा विक्रम त्याच्या नावावर केला आहे.

इशान किशनची ऐतिहासिक कामगिरी

इशान किशनने केलेल्या खेळीनंतर आज त्याने संघासाठी कमालीची कामगिरी करत इतिहास रचला आहे. ईशान किशन सहसा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, पण यावेळी फलंदाजीच्या क्रमात बदल झाला. श्रीलंकेविरुद्ध तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. वैभव सूर्यवंशीचाही संघात समावेश करण्यात आला होता, ज्यामुळे फलंदाजीच्या क्रमात बदल झाला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना किशनला कोणतीही अडचण आली नाही. त्याने चार चौकार आणि पाच षटकार मारत एक जबरदस्त खेळी केली आणि भारताला उच्च धावसंख्येपर्यंत पोहोचवले. इशान किशन हा आता पाचव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करुन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

इशान किशनच्या रेकॅार्डबद्दल सांगायचे झाले तर याआधी पाचव्या किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणारा मनीष पांडे याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. मनीष पांडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 79 धावांची खेळी खेळली होती आता इशान किशनने त्याची जागा घेतली आहे. युवराज सिंगने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 77 धावा केल्या होत्या. किशनने आता हे सर्व दिग्गज आकडे मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. इतकेच नाही, तर किशनने एक महत्त्वपूर्ण कामगिरीही केली आहे. टी20 आंतरराष्ट्रीय नॉकआऊट सामन्यांमध्ये दोनदा 50 पेक्षा जास्त धावा करणारा तो भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. किशनने रोहित शर्मा, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन प्रत्येकी सात धावांवर स्वस्तात बाद झाले. वैभव सूर्यवंशीने २१ चेंडूंमध्ये ३८ धावांची वेगवान खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने १३ धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इशान किशनने नाबाद ८० धावा केल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारताने ७ गडी गमावून १६९ धावा केल्या. श्रीलंकेचा संघ भारतासमोर टिकू शकला नाही आणि केवळ ४५ धावांवर गारद झाला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES