SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टेस्ट क्रिकेटमध्ये 29 वर्षांनी असं काही झालं, न्यूझीलंडच्या कर्णधाराची विकेट घेऊन जसप्रीत बुमराहने नावावर केला रेकॉर्ड

IND VS NZ Test : जसप्रीत बुमराहने पहिल्या टेस्ट सामन्याच्या दोन्ही इनिंगमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमची पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली. यासह जसप्रीत बुमराहने रेकॉर्ड नावावर केला आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 22, 2026, 12:57 IST | Updated: Nov 22, 2026, 13:34 IST
Image Credit: टेस्ट क्रिकेटमध्ये 29 वर्षांनी असं काही झालं, न्यूझीलंडच्या कर्णधाराची विकेट घेऊन जसप्रीत बुमराहने नावावर केला रेकॉर्ड
Join

IND VS NZ Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिला टेस्ट सामना हा वेलिंग्टन येथे खेळवला जात आहे. यात चौथ्या दिवशी टॉम लॅथम सोबत जे झालं ते अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुखावणारं होतं. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याला पहिल्या इनिंगमध्ये जसप्रीत बुमराहने बाद केले होते, त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये समोर धावांचा डोंगर असताना जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर टॉम लॅथम पुन्हा एकदा शून्य धावा करून बाद झाला. दोन्ही इनिंगमध्ये बुमराहने पहिल्याच ओव्हरला ही कामगिरी केली, त्यामुळे न्यूझीलंड संघावर प्रेशर बनलं.

टेस्टमध्ये 29 वर्षांनी झालं असं :

दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने टॉम लॅथमला बाद केले. लॅथम विकेट्स मागे ऋषभ पंतच्या हाती कॅच आउट झाला. दुसऱ्या डावात लॅथमने केवळ 2 बॉलचा सामना केला आणि तो कोणतीही धाव काढू शकला नाही. याआधी पहिल्या डावात बुमराहने त्याला क्लीन बोल्ड केले होते. तीन बॉलचा सामना करूनही तो एकही धाव काढू शकला नव्हता. वेलिंग्टन टेस्टमध्ये टॉम लॅथमच्या नशिबी आलेला हा प्रकार, कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या एखाद्या कर्णधाराच्या बाबतीत गेल्या 29 वर्षांत कधीही घडलेला नव्हता.

दोन्ही इनिंगमध्ये डक होणारा तिसरा न्यूझीलंडचा कर्णधार :

टॉम लॅथम हा टेस्ट सामन्याच्या दोन्ही डावांत शून्यावर बाद होणारा न्यूझीलंडचा तिसरा कर्णधार ठरला आहे. अशी पहिली घटना 1956  मध्ये घडली होती, जेव्हा हॅरी केव्ह वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावांत शून्यावर बाद झाले होते. अशा प्रकारची दुसरी घटना 1997 मध्ये घडली होती ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्टीफन फ्लेमिंग सहभागी होता. आता स्टीफन फ्लेमिंगच्या त्या घटनेनंतर 29 वर्षांनी भारतविरुद्धच्या सामन्यात टॉम लॅथमच्या बाबतीतही अगदी तशीच गोष्ट घडली आहे.

बुमराह बनला तिसरा भारतीय गोलंदाज :

जसप्रीत बुमराहने दोन्ही डावांत टॉम लॅथमला शून्यावर बाद करून एक उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. टेस्ट सामन्याच्या दोन्ही डावांत आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. श्रीसंतने 2006 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वप्रथम ही कामगिरी केली होती आणि त्यानंतर 2007 मध्ये झहीर खानने बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी साध्य केली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES