SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जय शाह यांची ICC अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

Jay Shah ICC President : जय शाह यांची पुन्हा एकदा आयसीसीच्या अध्यक्षपदावर निवड झालेली आहे. जय शाह यांच्या दुसऱ्या टर्मला सुरुवात होत असून त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 16, 2026, 12:37 PM IST | Updated: Nov 16, 2026, 12:50 PM IST
Image Credit: जय शाह यांची ICC अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड
Join

Jay Shah : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल म्हणजेच आयसीसीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा जय शाह यांची बिनविरोध निवड झाली आहे. लागोपाठ दुसऱ्यांदा जय शाह आता आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार असून बाली येथे झालेल्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. ज्यानंतर त्यांच्या समोर कोणताही उमेदवार नसल्याने जय शाह यांची बिनविरोध निवड झाली आणि त्यांना पुन्हा एकदा आयसीसी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

ICC ने केलं जय शाहंचं कौतुक :

आयसीसीने जय शाह यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाल्याचं सांगून एक्स हॅन्डलवर लिहिलं की, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बोर्डाने आनंदपूर्वक जाहीर केले आहे की, बाली येथे झालेल्या बोर्ड आणि समितीच्या बैठकांदरम्यान सर्व संचालकांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार, जय शाह यांची ICC अध्यक्षपदी दुसऱ्या कार्यकाळासाठी बिनविरोध फेरनिवड झाली आहे. हा निर्णय त्याच्या नेतृत्वावर मंडळाचा असलेला विश्वास दर्शवतो. क्रिकेटसाठीच्या या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर, खेळाचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी, चाहत्यांचा आधार वाढवण्यासाठी आणि भविष्यातील योजनांनुसार उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले करण्यासाठी असे पाऊल उचलणे आवश्यक आहे'.

जय शाह काय म्हणाले?

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सांगितलं की यापदावर काम करणं त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तो क्रिकेटला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी सर्व सदस्यांच्या सहकार्याने काम करेल. त्याने नमूद केले की, हा खेळ सध्या एका अत्यंत रोमांचक टप्प्यातून जात आहे आणि 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणे ही नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची एक उत्तम संधी आहे. शिवाय, त्यांची जबाबदारी केवळ मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यापुरतीच मर्यादित नाही. ती क्रिकेटचे भविष्य अधिक बळकट करण्यापर्यंत विस्तारलेली आहे आणि या ध्येयासाठी ते खेळाडू, चाहते, व्यावसायिक भागीदार आणि या खेळाशी संबंधित इतर सर्वांच्या हितांचे पूर्णपणे रक्षण करतील.

हेही वाचा : विराट कोहलीचा सल्ला न ऐकून श्रेयसने स्वतः केली मनमानी, Video पाहून फॅन्स नाराज

सर्वात कमी वयाचे आयसीसी अध्यक्ष :

 

जय शाह वर्ष 2024 मध्ये पहिल्यांदा आयसीसीचे चेअरमन बनले होते. त्यांनी इंग्लंडच्या ग्रेग बार्कलेची जागा घेतली होती तेव्हा त्यांचे वय 36 होते. यासह ते सर्वात कमी वयाचे आयसीसी अध्यक्ष ठरले होते. जय शाह हे पाचवे भारतीय आहेत जे आयसीसीचे अध्यक्ष बनले. यापूर्वी जगमोहन डालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर इत्यादी पद सांभाळलं आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES