माजी हॉकी कर्णधार एमएम सोमय्याच्या घरी चोरी, ऑलम्पिकचं सुवर्णपदक केलं लंपास, शोधासाठी विशेष पथक तैनात
Hockey : भारताच्या हॉकी संघाचे माजी खेळाडू एमएम सोमय्या यांच्यात घरात चोरीचा प्रकार घडला असून त्यांच्या घरातून इतर मौल्यवान वस्तूंसह ऑलम्पिकचं सुवर्णपदक सुद्धा चोरट्यांनी लंपास केलं आहे.
Hockey : बंगळुरूमध्ये भारतीय हॉकीचे माजी दिग्गज खेळाडू एमएम सोमय्या यांच्या घरात चोरीची घटना समोर आली. अज्ञान चोरट्याने त्याच्या घरून मौल्यवान सामान चोरी केलं. ज्यात सुवर्ण पदकाचा सुद्धा समावेश होता. हे सुवर्णपदक त्यांनी 1980 मध्ये मॉस्को ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाकडून खेळताना जिंकलं होतं. पोलिसांनी बुधवारी या चोरीबाबत माहिती दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सादर घटना ही 28 ऑक्टोबर रोजी एचएएल थर्ड स्टेज भागात झाली जो इंदिरानगर पोलीस क्षेत्राच्या अंतर्गत येतो.
सदर चोरीची घटना घडली तेव्हा 67 वर्षीय हॉकी खेळाडू सोमय्या आपल्या कुटुंबासोबत यात्रेवर गेले होते. एफआयआरनुसार ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा सोमय्या यांच्या शेजाऱ्याने त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहिले. त्यांना चोरी झाल्याचा संशय आला आणि त्यानंतर त्यांनी सोमय्या यांना याबद्दल माहिती दिली.
फक्त ऑलम्पिकचं नाही तर.... :
एफआयआरमध्ये सांगण्यात आलं की, 'सदर घटनेनंतर शेजारी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी करण्यात आली तेव्हा समजलं की 28 ऑक्टोबरच्या रात्री सुमारे 2:34 वाजता एक अज्ञात व्यक्ती तक्रारदारांच्या घरी दाखल झाला. त्यापैकी एकाने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता, तर दुसऱ्याने लाल रंगाचा शर्ट घातला होता. एफआयआरनुसार, दोन्ही आरोपींनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि आत ठेवलेल्या मौल्यवान वस्तू चोरून नेल्या'.
चोरी झालेल्या सामानात 1980 मध्ये एमएम सोमय्या यांनी जिंकलेल्या मॉस्को ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने जिंकलेल्या सुवर्णपदकाचा सुद्धा समावेश होता. याशिवाय 1982 रोजी दिल्लीत झालेल्या आशियाई खेळांमध्ये पटकावलेलं रजत पदक, 1986 मध्ये सियोल आशियाई खेळांमध्ये जिंकलेलं कांस्य पदक आणि 1982 मध्ये एम्स्टर्डममध्ये पटकावलेलं कांस्य पदक सुद्धा चोरी झालं आहे. याव्यतिरिक्त चांदीच्या काही वस्तू, सोन्याचे दागिने आणि 30,000 रुपये रोख रक्कमही चोरीला गेली आहे.
हेही वाचा : ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा
गुन्हा दाखल करून शोधासाठी विशेष पथक नेमलं :
एफआयआरच्यानुसार चोरी झालेल्या सामानाची एकूण किंमती जवळपास 3.53 लाख रुपये एवढी आखण्यात आली आहे. सोमय्या यांच्या तक्रारीवरून इंदिरा नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(4) आणि कलम 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.