निवृत्तीनंतरही धोनीच CSK चा बॉस? टीममध्ये कोण IN, कोण OUT... तोच ठरवणार?
आता आगामी लिलावामध्ये धोनी लिलावाच्या टेबलवर सीएसकेच्या संघासाठी बोली लावणार का? यावर माजी खेळाडू इरफान पठाण याने स्पष्टीकरण दिले आहे.
काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2027 च्या लिलावाआधी फ्रॅन्चायझींनी रिटेन आणि रिलीज यादी जाहीर केली. आयपीएल 2027 चा मिनी लिलाव हा गोव्यामध्ये 16 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या लिलावामध्ये अनेक संघाचे नवे कोच त्याचबरोबर नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. अनेक मोठे ट्रेड झाले आणि त्यामुळे अनेक संघामध्ये अदलाबदली पाहायला मिळाली आहे. आता आगामी लिलावामध्ये एक मोठा क्रिकेट विश्वातील चर्चेचा विषय म्हणजेच एमएस धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घोषणा केली आहे तो आता सीएसकेसाठी मेंटोर म्हणून असणार आहे. आता आगामी लिलावामध्ये धोनी लिलावाच्या टेबलवर सीएसकेच्या संघासाठी बोली लावणार का? यावर माजी खेळाडू इरफान पठाण याने स्पष्टीकरण दिले आहे.
इरफान पठाण हा आता आगामी आयपीएल 2027 च्या लिलावामध्ये उपस्थित राहणार नाही, त्याने त्याच्या जिओस्टारवरील 'टाटा आयपीएल २०२७ रिटेन्शन स्पेशल' कार्यक्रमात हे स्पष्ट सांगितले आहे. या माजी भारतीय क्रिकेटपटूने मान्य केले की, धोनी एक मार्गदर्शक आहे आणि खेळाडूंना मार्गदर्शन करणे हे त्याचे काम आहे, लिलावाच्या टेबलावर बसणे नाही. तो आपले अनुभव सांगेल आणि सीएसके सामने कसे जिंकू शकते हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, धोनीने कर्णधारपद सोडल्यापासून चेन्नई एकदाही प्लेऑफसाठी पात्र ठरलेली नाही. मागील काही वर्षांमध्ये सीएसकेच्या संघासाठी फार काही चांगले सिझन राहिले नाहीत.
हे ही वाचा
सामना ड्रॅा झाल्यानंतर आर अश्विन शुभमन गिलवर संतापला! म्हणाला 'एक तास आधीच हार का मानली...?'
जिओस्टारवरील 'टाटा आयपीएल 2027 रिटेन्शन स्पेशल' कार्यक्रमामध्ये त्याला धोनी लिलावाच्या टेबलवर असणार का? यासंदर्भात प्रश्न केल्यानंतर त्याचे उत्तर नाही होते. पुढे इरफान पठाण म्हणाला की, धोनीकडे पाहता मला नाही वाटत की तो ऑक्शनमध्ये दिसेल कारण त्याला प्रसिद्धीपासून दूर राहायला आवडते हे एक त्याचे कारण आहे. त्याचबरोबर खेळाडूंना मैदानावर मार्गदर्शन करणे आणि त्यांना त्याला असलेल्या अनुभवाबद्दल सांगणे हे त्याचे काम आहे. सीएसकेच्या संघाला आगामी सिझनमध्ये सामने कसे खेळाडूंना जिंकवता येतील याबद्दल त्याला सांगायचे आहे.
पुढे इरफान पठाण म्हणाला की, बोली लावण्याचे आणि लिलावाचे निर्णय व्यवस्थापनावर सोडले जातात. धोनीला मैदानावर गोष्टी सोप्या ठेवायला आवडतात, त्याला संघामधील अनेक खेळाडू चांगले ओळखतात ते त्याला त्याचे काम करु देतात. मैदानाबाहेरील गोष्टींचे श्रेय घेऊन प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्याची कधीच इच्छा नसते .