जगातील एकमेव गोलंदाज, ज्याच्या विरुद्ध सचिन तेंडुलकर एकही धाव करू शकला नाही
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने भारतासाठी 200 टेस्ट, 463 वनडे आणि 1 टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. दरम्यान 800 पेक्षा जास्त बॉलचा सामना करत सचिनने अनेक धावा करून अनेक रेकॉर्डस् मोडले. मात्र जगात एक असा गोलंदाज आहे ज्याच्या विरुद्ध सचिन तेंडुलकर एकही धाव करू शकला नाही/
Sachin Tendulkar : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला जगभरात गॉड ऑफ क्रिकेट नावाने ओळखलं जातं. या खेळात सचिन तेंडुलकरने अनेक रेकॉर्डस् नावावर केले. 24 वर्षांच्या करिअरमध्ये सचिन तेंडुलकरने भारतासाठी 200 टेस्ट, 463 वनडे आणि 1 टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सर्व सामन्यात सचिन तेंडुलकरने आपल्या संपूर्ण करिअर दरम्यान 800 पेक्षा जास्त बॉलचा सामना केला.
संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये सचिनने 800 सामन्यात सर्व गोलंदाजांविरुद्ध सचिनने सरासरी किमान एक धाव तरी काढली होती. मात्र एक असा गोलंदाज आहे ज्याच्याविरुद्ध सचिन आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एकही धाव काढू शकला नाही आणि ज्याने त्याची विकेटही घेतली. हा गोलंदाज दुसरा कोणीही नसून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये स्मिथने सचिनविरुद्ध केवळ एकदाच गोलंदाजी केली होती आणि त्यावेळी त्याने सचिनला LBW बाद केले होते.
हेही वाचा : मुंबई इंडियन्सच्या सामान्यांचं शेड्युल समोर, पाहा कधी अन् कुठे खेळवले जाणार?
स्पिनर म्हणून सुरु झालेलं करिअर :
स्टीव स्मिथला सध्याच्या क्रिकेटमध्ये एक दिग्गज फलंदाज म्हणून ओळखलं जातं. मात्र, फार कमी लोकांना माहीत आहे की स्मिथने आपल्या कारकिर्दीची सुरुवात लेग-स्पिनर म्हणून केली होती आणि तो फलंदाजीसाठी खालच्या क्रमांकावर येत असे. पुढे त्याने गोलंदाजीपेक्षा फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित केले आणि आज तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक बनला आहे.
मोहालीमध्ये सचिनला केलेलं OUT :
मार्च 2013 मध्ये मोहाली येथे खेळल्या गेलेल्या एका टेस्ट सामन्यात स्टीव्ह स्मिथने सचिन तेंडुलकरला बाद केले होते. स्मिथने सचिनला गोलंदाजी केली, तेव्हा त्याने आपल्या पहिल्याच बॉलवर त्याला LBW पद्धतीने बाद केले. याच कारणामुळे सचिन त्याच्याविरुद्ध एकही धाव काढू शकला नाही. त्यानंतर सचिन आणि स्मिथ पुन्हा कधीही एकमेकांसमोर आले नाहीत, म्हणूनच हा अनोखा विक्रम त्याच्या नावावर कायम आहे.