RCB चा स्टार खेळाडू झाला बाबा! घरी झाले लक्ष्मीचे आगमन
जितेश शर्मा आणि शलाका शर्मा यांच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. जितेश शर्माची पत्नी शलाका शर्माने सोशल मिडियावर फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
काही दिवसांपूर्वीच फ्रन्चायझींनी रिटेन आणि रिलीज यादी जाहीर केली आहे, आरसीबीचा विकेटकिपर जितेश शर्माला फ्रन्चायझीने रिटेन केले आहे. आता त्याला संघामध्येच ठेवल्यानंतर जितेश शर्माला आणखी एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. आरसीबीचा स्टार खेळाडू जितेश शर्मा आणि त्याची पत्नी शलाका शर्मा यांच्या घरी नवी पाहुणी आली आहे. जितेश शर्मा आणि शलाका शर्मा यांच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. जितेश शर्माची पत्नी शलाका शर्माने सोशल मिडियावर फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
जितेश शर्माची पत्नी शलाका शर्माने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहे यामध्ये तिने लिहीले आहे की, सर्वात छोटे हात, सर्वात मोठे प्रेम !! 24/11/2026. म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी जितेश शर्माला मुलगी झाली आहे, दोन दिवसांनंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी बेबी शॅावरचे काही फोटो जितेश शर्माने त्याच्या सोशल मिडियावर अकाउंटवर शेअर केले होते यावेळी अनेकांना त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
2026 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकामधून शेवटच्या वेळेला जेव्हा जितेश शर्माचे नाव वगळण्यात आले त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. जितेश शर्माच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर आरसीबीचा संघ मागील दोन वर्षांमध्ये दमदार फॉर्ममध्ये पाहायला मिळाला आहे. आरसीबीच्या संघाकडे रजत पाटीदारकडे जेव्हापासून संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे तेव्हापासून आरसीबीच्या संघाने सलग दोन वेळा ट्रॅाफी जिंकली आहे. जितेश शर्माने आरसीबीच्या मागील वर्षांमध्ये विजय मिळवण्याच्या या कामगिरीत महत्त्वाचे योगदान दिले आहे.