'हार्दिकच्या जागी पर्याय शोधणे थांबवा...' सुनील गावस्कर यांचा गौतम गंभीरला इशारा!
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या मागील काही काळापासून सातत्याने दुखापतीशी झुंजत आहे. आता भारताचे दिग्गज माजी स्टार खेळाडू सुनील गावस्कर यांनी हार्दिक पांड्याबद्दल मोठे विधान केले आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पाच सामन्यांची मालिका पार पडली, या मालिकेमध्ये भारतीय संघाची गोलंदाजी कमकुवत पाहायला मिळाली. टीम इंडियाचे अनेक खेळाडू हे मागील काही काळापासून दुखापतीशी झुंजत आहेत. त्यामुळे अनेक नव्या खेळाडूंना भारतीय संघामध्ये स्थान मिळाले आहे. पण अनेक नवे खेळाडू हे अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकले नाहीत, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या मागील काही काळापासून सातत्याने दुखापतीशी झुंजत आहे. मागील अनेक महिन्यांपासून तो मैदानावर टीम इंडियात खेळलेला नाही. आता भारताचे दिग्गज माजी स्टार खेळाडू सुनील गावस्कर यांनी हार्दिक पांड्याबद्दल मोठे विधान केले आहे.
हार्दिक पांड्या हा चॅम्पियन खेळाडू हे सर्वांनाच ठाऊक आहे, त्याने त्याच्या गोलंदाजीने त्याचबरोबर फलंदाजीने देखील भारतीय संघासाठी प्रभावी कामगिरी केली आहे. पण मागील काही काळापासून त्याला झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडिया हार्दिक पांड्या रिप्लेसमेंट खेळाडू शोधण्याच्या तयारीत आहे. आता सुनील गावस्कर यांनी बीसीसीआय आणि भारतीय संघाला एक सल्ला दिला आहे. सुनील गावस्कर म्हणाले की, "कधीकधी आपण हार्दिक पांड्याच्या जागी पर्याय शोधण्यातच जास्त अडकून पडतो. त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही, जर तुम्हाला त्याच्या तोडीचा खेळाडू सापडत नसेल, तर अशा खेळाडूला संधी द्या जो संघासाठी थोडी वेगळी भूमिका बजावू शकेल," असे गावस्कर शनिवारी रात्री बंगळूरुमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धचा पाचवा आणि अंतिम टी-20 आंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर जिओस्टारवर म्हणाले. पाच सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली.
हे ही वाचा
IND vs WI निर्णायक सामना पावसामुळे रद्द, कोणी मारली मालिकेत बाजी? वाचा सविस्तर
नमन धीरला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली, या सामन्यामध्ये त्याने अनेक क्रिकेट तज्ञांना प्रभावित केले आहे. नमन धीरच्या कामगिरीबद्दल बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, नमन धीर हा असा खेळाडू आहे जो फलंदाजी आणि गोलंदाजी देखील करतो. नमन धीर नेमके तेच करत आहे तो आपली गोलंदाजी देखील चांगली करत आहे त्याचबरोबर त्याची पाचव्या सामन्यामधील फलंदाजी देखील पहा असे सुनील गावस्कर म्हणाले. यावेळी पाचव्या सामन्यामध्ये नमन धीरने 6 चेंडूमध्ये 24 धावा केल्या.
सुनील गावस्कर यांनी पुढे असेही सांगितले की, भारताच्या संघाने नियमित किमान चार गोलंदाजांना मैदानामध्ये उतरवायला पाहिजे हा या मालिकेमधून धडा शिकण्यासारखा आहे. टीम इंडियासाठी पाचवा आणि सहावा पर्याय हा अष्टपैलूचा असणे गरजेचे आहे. नमन एक फलंदाज आहे, पण तो दोन-तीन षटके गोलंदाजीही करू शकतो. अक्षर पटेल हा आणखी एक खेळाडू आहे जो आपली चार षटके पूर्ण करू शकतो."