SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शुभमन गिल मैदानावर पंचांशी भिडला, बुमराहही संतापला! नक्की झाले काय? पहा Video

भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यामध्ये भारताचा संघाचा कर्णधार शुभमन गिलचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे यामध्ये शुभमन गिल हा अंपायरशी वाद घालताना दिसत आहे, नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 19, 2026, 18:32 IST | Updated: Nov 19, 2026, 18:41 IST
Join

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटीला सुरुवात झाली आहे, पहिल्या दिवसाच्या संमाप्तीनंतर भारताचा संघ अडचणीमध्ये पाहायला मिळाला आहे. टीम इंडियाने पहिल्या सेशनमध्ये कमालीची कामगिरी केली पण त्यानंतर पुढील दोन सेशनमध्ये भारतीय संघाची गोलंदाजी कमकुवत पाहायला मिळाली. त्याचबरोबर भारताच्या संघामध्ये काही महत्त्वाच्या चुका देखील पाहायला मिळाल्या. या सामन्यामध्ये भारताचा संघाचा कर्णधार शुभमन गिलचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे यामध्ये शुभमन गिल हा अंपायरशी वाद घालताना दिसत आहे, नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.

कर्णधार शुभमन गिल हा पंचाच्या एका निर्णयावर मैदानावर असलेल्या अंपायरशी वाद घालताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, डावाच्या 31 व्या ओव्हरमध्ये, जसप्रीत बुमराहचा एक वेगवान चेंडू आत येऊन ग्लेन फिलिप्सच्या पॅडला लागला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी अपील केले. पंचांनी त्याला नाबाद घोषित केले, त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि बुमराह यांच्यात चर्चा झाली. गिलच्या मते चेंडू बॅटला लागला नव्हता. चेंडू यष्टींवरून गेला असावा या विचाराने बुमराह गोंधळला होता. मात्र, थोड्याच वेळात गिलने डीआरएस घेतला. पंचांनी संपूर्ण घटनेची तपासणी केली.

हे ही वाचा

वैभव सूर्यवंशी दिसणार अ‍ॅक्शनमध्ये, जिओहॅाटस्टारवर नाही 'येथे' पाहता येणार सामन्याची Live Streaming

समोरून घेतलेल्या कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये बॅटची कड स्पष्टपणे दिसत नव्हती, परंतु चेंडू बॅटजवळ येत असताना एक टोकदार भाग दिसत होता. तिसरे पंच पॉल रेफेल यांनी एलबीडब्ल्यूच्या निर्णयाची वेगवेगळ्या कोनातून तपासणी केली. चेंडू किंचित विचलित झाल्याचे पंचांच्या लक्षात आले आणि त्यांनी नाबादचा निर्णय कायम ठेवला. या पंचाच्या निर्णयावरुन गिलने मैदानावर बराचवेळ वाद घातला पण पंचाचा निर्णय हा अंतिम घोषित करण्यात आला.  बुमराहसुद्धा थोडा संतप्त दिसत होता. तिसऱ्या पंचांचा निर्णय वैध आहे आणि याच कारणामुळे गिल थोड्याच वेळात मैदानाबाहेर गेला. टीम इंडियाने एक महत्त्वपूर्ण रिव्ह्यूसुद्धा गमावला.

आजच्या पहिल्या दिवसाच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर जसप्रीत बुमराह कमालीच्या लयीत पाहायला मिळाला, त्याने संघासाठी तीन विकेट्स घेतले, तर आकाशदीप एक आणि अंशुल कंबोजने संघासाठी एक विकेट घेतला. या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघासाठी ग्लेन फिलिप्स आणि हेनरी निकोलस यांनी भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. हेनरी निकोलसने संघासाठी शतक झळकावले आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES