SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारत विश्वचषकासाठी सज्ज, टीम इंडियाचे श्रीलंकेविरुद्ध वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या तारखा आणि ठिकाणे

2027 च्या विश्वचषकाची तयारी भारतीय संघाची सुरु आहे त्यामुळे भारतीय संघाचे वेळापत्रक मागील काही दिवसांपासून ते विश्वचषकापर्यत व्यस्त असणार आहेत. आता भारताचा संघ न्यूझीलंडविरुद्ध मालिकेनंतर भारताचा संघ कोणती मालिका खेळणार आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 07, 2026, 09:35 PM IST | Updated: Oct 07, 2026, 09:45 PM IST
Join

भारताचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका झाल्यानंतर भारताचा संघ मोठ्या न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारताचा संघ पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे, त्याचबरोबर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका देखील खेळवली जाणार आहे. एवढेच नाही तर 2 कसोटी सामन्यांची मालिका देखील होणार आहे, त्यानंतर मग भारताचा संघ कोणती मालिका खेळणार आहे यासंदर्भात बीसीसीआयने माहिती शेअर केली आहे. 2027 च्या विश्वचषकाची तयारी भारतीय संघाची सुरु आहे त्यामुळे भारतीय संघाचे वेळापत्रक मागील काही दिवसांपासून ते विश्वचषकापर्यत व्यस्त असणार आहेत. आता भारताचा संघ न्यूझीलंडविरुद्ध मालिकेनंतर भारताचा संघ कोणती मालिका खेळणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाची मालिका झाली यामध्ये भारताचे खेळाडू दमदार फार्ममध्ये पाहायला मिळाले. भारताच्या संघाने एकदिवसीय मालिकेमध्ये 2-1 असा विजय नोंदवला, आता भारताची नजर न्यूझीलंडविरुद्ध मालिकेवर असणार आहे. पण त्यानंतर भारत मायदेशामध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्टार स्पोर्ट्सने भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा प्रोमो देखील प्रसिद्ध केला आहे, जी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. चला, सामने कधी आणि कुठे खेळले जातील यासह या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक पाहूया.

भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

भारत आणि श्रीलंका यांच्यात डिसेंबरच्या सुरुवातीला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे, एकदिवसीय सामन्यांनंतर, दोन्ही संघ तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतही एकमेकांविरुद्ध खेळतील. त्याआधी, भारतीय संघ न्यूझीलंडच्या मोठ्या दौऱ्यावर जात आहे, जिथे ते पाच टी-20, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळतील. हा दौरा 22 ऑक्टोबर ते 1 डिसेंबरपर्यंत चालेल. या दौऱ्यावरून परतल्यानंतर लगेचच संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल.

दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 13 डिसेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना 16 डिसेंबर रोजी चेन्नईतील एम. चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना 19 डिसेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.

टी20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी20 सामना -22 डिसेंबर 2026 - राजकोट 
दुसरा टी20 सामना - 24 डिसेंबर 2026 - बारामती 
तिसरा टी20 सामना - 27 डिसेंबर 2026 - पुणे
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES