SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कोण आहे उमा काश्वी? वैभव सूर्यवंशीपेक्षा कमी वयात मिळालं WPL मध्ये संधी, कहाणी वाचून तुम्हीही कौतुक कराल

WPL 2027 Auction : महिला प्रीमियर लीगच्या पाचव्या सीजनसाठी बुधवारी मिनी ऑक्शन पार पडलं. कोची येथील पार पडलेल्या या ऑक्शनमध्ये 15 वर्षांच्या एका महिला खेळाडूला दिल्ली कॅपिटल्समने 10 लाख रुपये खर्चून आपल्या संघात घेतले.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 29, 2026, 01:20 PM IST | Updated: Oct 29, 2026, 02:11 PM IST
Image Credit: कोण आहे उमा काश्वी? वैभव सूर्यवंशीपेक्षा कमी वयात मिळालं WPL मध्ये संधी
Join

Who Is Uma Kashvi? बुधवार 28 ऑक्टोबर रोजी महिला प्रीमियर लीगचा मिनी ऑक्शन पार पडला.  या ऑक्शनमध्ये एकूण 150 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. मात्र या सगळ्यात WPL ऑक्शनमधील सर्वात कमी वयाची खेळाडू ही प्रसिद्धीच्या झोतात आली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचं प्रतिनिधित्व करणारी 15 वर्षांची उमा काश्वी हिला दिल्ली कॅपिटल्सने 10 लाख रुपयांना विकत घेतलं. उमाची कहाणी ही थोडीफार वैभव सूर्यवंशी सारखी असून तो आयपीएलमध्ये खेळणारा सर्वांत कमी वयाचा खेळाडू आहे.

कोण ठरलं महागडी खेळाडू?

महिला प्रीमियर लीगच्या पाचव्या सीजनसाठी मिनी ऑक्शन पार पडलं. बुधवारी कोची येथे झालेल्या ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाची सोफी मोलिनक्स ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. तिला यूपी वॉरियर्सने 1.1 कोटी रुपयांना विकत घेतले. सोफी मोलिनक्सची बेस प्राईस 50 लाख रुपये होती. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये किरण नवगिरे ही सर्वात महागडी खेळाडू ठरली, जिला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात सामील केले. दिल्लीच्या फ्रँचायझीने उमा काशवीलाही आपल्या संघात घेतले आहे.

कोण आहे उमा काश्वी?

भारताच्या पुरुष संघाने जेव्हा 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकलेला तेव्हा एक आठवड्यापूर्वी उमा काश्वीचा जन्म झाला होता. उमा काश्वी चा जन्म 9 एप्रिल 2011  मध्ये झाला होता. वैभव सुर्यवंशीने वयाच्या 15 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले. मात्र जेव्हा राजस्थान रॉयल्सने त्याला विकत घेतले तेव्हा वैभवचे वय अवघे 14 वर्षे होते. राजस्थानने त्याला 1.1 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले, ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासात एखाद्या संघाद्वारे करारबद्ध झालेला सर्वात तरुण खेळाडू ठरला. महिला प्रीमियर लीगमध्ये करार मिळवणारी उमा काश्वी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. यापूर्वी हरियाणाची दीया यादव हिच्या नावावर हा रेकॉर्ड होता.  ती महिला वर्षी दिल्ली कॅपिटल्समध्ये सहभागी झालेली. दियाला 16 व्या वर्षी WPL चं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं.

उमा काश्वी हि जेव्हा 7 वर्षांची होती तेव्हा पासून तिने घराजवळ असलेल्या एका क्रिकेट अकादमीतून खेळणं सुरु केलं. ती लागोपाठ चांगली कामगिरी करत राहिली. आता, वयाच्या 15 व्या वर्षी, तिने वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये स्थान मिळवले आहे. तिथे आपल्या कामगिरीच्या जोरावर ती राष्ट्रीय संघातही स्थान मिळवू शकते. वैभव सूर्यवंशीची गोष्टही काहीशी अशीच आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वी, तो देखील प्रामुख्याने त्याच्या वयामुळे चर्चेत होता. पुढे त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकते.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES