भारत फायनलमध्ये पोहोचणार का? आजच्या सेमीफायनलमध्ये भिस्त, शेजारच्या देशाचे आव्हान!
यूएईविरुद्ध सामन्यामध्ये भारताच्या फलंदाजीने प्रभावी कामगिरी दाखवली. आता भारताचा संघासमोर श्रीलंका अ संघाचे आव्हान असणार आहे, त्यामुळे भारताच्या संघाच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.
India A vs Sri Lanka A Semi final : भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यामध्ये मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 चा सेमीफायनलचा सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे, आजच्या सामन्यामध्ये जो संघ विजय मिळवणार तो संघ फायनलमध्ये स्थान पक्के करणार आहे. वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा येथे भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यामध्ये होणाऱ्या सेमीफायनल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यूएईविरुद्ध सामन्यामध्ये भारताच्या फलंदाजीने प्रभावी कामगिरी दाखवली. आता भारताचा संघासमोर श्रीलंका अ संघाचे आव्हान असणार आहे, त्यामुळे भारताच्या संघाच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.
यूएईविरुद्ध सामन्यामध्ये भारताच्या संघाने काही महत्त्वाचे प्लेइंग 11 मध्ये बदल केले होते. आयुष बडोनी त्याचबरोबर प्रिन्स यादव आणि विप्रज निगमसारख्या खेळाडूंना प्लेइंग 11 मधून बाहेर केले होते. त्याच्या जागेवर अरशद खान, प्रभसिमरण सिंग आणि हर्ष दुबे या खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. भारताचा ग्रुप स्टेजचा शेवटचा आणि महत्त्वाचा सामना हा यूएईविरुद्ध पार पडला. या सामन्यामध्ये यूएईच्या संघाला वैभव सूर्यवंशीने एकतर्फी पराभूत केले. वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्ध सामन्यात 53 चेंडूमध्ये 204 धावा केल्या त्याच्या या खेळीने तो पुन्हा चांगल्या फॅार्ममध्ये आल्याचे दिसले.
हे ही वाचा
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेनंतर टीम इंडिया मायदेशात खेळणार सिरीज, वाचा संपूर्ण वेळापत्रक!
यूएईविरुद्द सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीनंतर आता तो श्रीलंका ए विरुद्ध कामगिरी करणार याकडे सर्वांची नजर असणार आहे. तर अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये अर्धशतक झळकावले होते पण तो यूएईविरुद्ध पूर्णपणे फेल झाला. त्याचबरोबर भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा देखील या स्पर्धेमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाला त्याने आतापर्यत सर्वाधिक धावा भारतीय संघासाठी केल्या आहेत. एशिया कप रायझिंग स्टार्समध्ये, इंडिया 'अ' संघाने गट टप्प्यात दोन सामने जिंकून उपांत्य फेरीत स्थान मिळवले. भारताने गट 'ब' मध्ये दुसरे स्थान पटकावले असून, आता त्यांचा सामना गट 'अ' मधील अव्वल संघ असलेल्या श्रीलंकेशी होईल.
इंडिया 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना आज, 26 नोव्हेंबर रोजी दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे नाणेफेक हे 3.00 वाजता होणार आहे. भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील आशिया कप रायझिंग स्टार्स उपांत्य फेरीचा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. समालोचन इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असेल. चाहते सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवरही हा सामना थेट पाहू शकतात.