SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

वैभव सूर्यवंशी दिसणार अ‍ॅक्शनमध्ये, जिओहॅाटस्टारवर नाही 'येथे' पाहता येणार सामन्याची Live Streaming

भारतीय संघाचा पहिला ग्रुप स्टेज सामना नेपाळविरुद्ध होणार आहे, या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे होणार आहे, त्याचबरोबर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग किती वाजता सुरु होणार आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 19, 2026, 16:44 IST | Updated: Nov 19, 2026, 17:09 IST
Join

इमर्जिंग आशिया कप 2026 सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत, बीसीसीआयने भारत अ संघ एक मजबूत संघ पाठवला आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ ही स्पर्धा खेळताना दिसणार आहे. या संघामध्ये अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी हे भारतीय पुरुष टी20 संघामध्ये खेळणारे महत्त्वाचे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. त्याचबरोबर असे काही खेळाडू आहेत त्यांनी काही वेळेआधी भारतासाठी पदार्पण केले आहे त्यांना देखील स्पर्धा खेळावी लागणार आहे. पहिला ग्रुप स्टेज सामना टीम इंडियाचा नेपाळविरुद्ध होणार आहे, या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे होणार आहे, त्याचबरोबर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग किती वाजता सुरु होणार आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.

किती वाजता सुरु होणार भारत ए विरुद्ध नेपाळ सामना?

भारत अ संघ तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेचा पहिला सामना नेपाळविरुद्ध शुक्रवार, 20 नोव्हेंबर रोजी कतारची राजधानी दोहा येथे खेळवला जाणार आहे. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सामना सुरू होण्याच्या केवळ अर्धा तास आधी, दुपारी 3.00 वाजता होईल. प्रेक्षकांनी हे लक्षात घ्यावे की ही स्पर्धा 50 षटकांच्या एकदिवसीय स्वरूपात खेळवली जात आहे, टी20 स्वरूपात नाही. त्याच दिवशी पाकिस्तानचा संघही युएईविरुद्ध मैदानात उतरेल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सुरू होईल. तर या सामन्याचे भारतीय प्रमाणवेळेनुसार 11.00 वाजता होणार आहे. 

हे ही वाचा

सिराजला पहिल्या सामन्यातून का वगळलं, बॅटींग कोचने दिलं स्पष्टीकरण! म्हणाले - 'सिराजबाबत कोणतीही...'

कुठे पाहता येणार सामन्याचे लाईव्ह?

भारत विरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये होणार इमर्जिंग आशिया कप 2026 ग्रुप स्टेजच्या सामन्याचे टेलिव्हिजवर थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे, तर सोनी लिव्ह ॲप किंवा प्लॅटफॉर्मद्वारे लॅपटॉप आणि टॅब्लेटवरही सामना थेट पाहता येईल. तथापि, हा सामना पाहण्यासाठी कोणताही पूर्णपणे विनामूल्य पर्याय उपलब्ध नाही आणि थेट प्रक्षेपणासाठी वर्गणी किंवा शुल्क आवश्यक असेल. म्हणजेच सामना पाहण्यासाठी चाहत्यांना सब्स्क्रिशनची गरज भासणार आहे. 

भारताचा संपूर्ण अ संघ 

अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), तिलक वर्मा (कर्णधार), रिंकू सिंह (उपकर्णधार), कुमार कुशाग्र, सूर्यांश शेंडगे, शाहबाज अहमद, विप्रज निगम, हर्ष दुबे, तनुश कोटियन, हर्षित राणा, प्रिंस यादव, अरशद खान आणि आयुष बडोनी.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES