• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /सिराजला पहिल्या सामन्यातून का वगळलं, बॅटींग कोचने दिलं स्पष्टीकरण! म्हणाले - 'सिराजबाबत कोणतीही...'

सिराजला पहिल्या सामन्यातून का वगळलं, बॅटींग कोचने दिलं स्पष्टीकरण! म्हणाले - 'सिराजबाबत कोणतीही...'

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यातून सिराजला प्लेइंग 11 मधून बाहेर केल्यानंतर अनेक प्रश्न भारतीय मॅनेजमेंटवर उपस्थित केले जात आहेत. यावर आता सितांशू कोटक यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 19, 2026, 14:35 IST|Updated: Nov 19, 2026, 14:54 IST
joinshare
सिराजला पहिल्या सामन्यातून का वगळलं, बॅटींग कोचने दिलं स्पष्टीकरण! म्हणाले - 'सिराजबाबत कोणतीही...'

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या पहिल्या सामन्यामध्ये भारतीय मॅनेजमेंटचा एक धक्कादायक आणि सर्वांना चकीत करणारा निर्णय पाहायला मिळाला. भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजेच मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाला प्लेइंग 11 मधून वगळण्यात आले आहे. रवींद्र जडेजाला वगळण्याचे कारण समजण्यासारखे आहे की न्यूझीलंडची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकुल नाही त्यामुळे मग रवींद्र जडेजा भारतीय संघामधून वगळण्यात आले आहे पण आता सिराजला प्लेइंग 11 मधून बाहेर केल्यानंतर अनेक प्रश्न भारतीय मॅनेजमेंटवर उपस्थित केले जात आहेत.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह टीम इंडियामध्ये आक्रमण गोलंदाजीमध्ये अंशुल कंबोज, प्रसिद्ध कृष्णा आणि आकाशदीप यांना भारतीय संघामध्ये स्थान मिळाले. मोहम्मद सिराजला वगळल्यानंतर संघ व्यवस्थापनाने स्पष्टीकरण दिले आणि बॅटींग कोच सितांशू कोटक यांनी सांगितले की, सिराजबाबत कोणतीही अडचण नाही. संघ निवडताना, आम्हाला वाटले की हा सर्वोत्तम 11 खेळाडूंचा संघ आहे. सिराजला वगळण्याचा निर्णय चुकीचा होता असे मला वाटत नाही. हा फक्त पहिला दिवस आहे. आम्ही केवळ पहिल्या दिवसासाठीच नव्हे, तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवसांचाही विचार करून संघ निवडतो," असे कोटक यांनी पत्रकारांना सांगितले.

हे ही वाचा

धक्कादायक! ग्रीनच्या तोंडावर चेंडू लागला अन् मैदानावर कोसळला; तोंडातून रक्त येताच सोडले मैदान

वॅाशिंग्टन सुंदर भारतीय प्लेइंग 11 मध्ये खेळण्याच्या निर्णयावर बोलताना कोटक म्हणाले की, न्यूझीलंडच्या आघाडीच्या फळीत चार डावखुरे फलंदाज असल्यामुळे संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. "आम्ही वॉशिंग्टनला प्राधान्य दिले कारण त्यांच्या आघाडीच्या फळीत चार डावखुरे फलंदाज होते. या सामन्यासाठी हा सर्वोत्तम संभाव्य गोलंदाजीचा मारा आहे," असे ते म्हणाले. भारताच्या संघाने पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली केली होती, यावेळी असे वाटले की भारताच्या संघाचे निर्णय कमालीचे पाहायला मिळाले पण त्यानंतर न्यूझीलंडची फलंदाजी मजबूत दिसली आहे.

भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात टॉम लॅथमला बाद करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. बुमराहने तीन बळी घेतले आणि 70 धावांवर न्यूझीलंडचा निम्मा संघ बाद झाला. मात्र, त्यानंतर हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी न्यूझीलंडला सामन्यात परत आणले. त्यांनी मिळून जवळपास 54 षटके फलंदाजी केली आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत ते नाबाद राहिले. फिलिप्स (94) आणि निकोल्स (113) खेळपट्टीवर आहेत. त्यांच्या भागीदारीने आतापर्यंत 173 धावा केल्या आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Mohammed Siraj