सामन्याची वेळ बदलली, किती वाजता सुरु होणार मॅच? एका क्लिकवर वाचा सामन्याची संपूर्ण माहिती
इमर्जिंग आशिया कप 2026 स्पर्धेमध्ये टीम इंडियाचा आज शेवटचा ग्रुप स्टेजचा सामना खेळवला जाणार आहे, या सामन्याच्या वेळेमध्ये बदल झाला आहे यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.
इमर्जिंग आशिया कप 2026 चा भारत अ संघाचा आज शेवटचा ग्रुप स्टेजचा सामना खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, या सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर आता टीम इंडियासाठी आजचा सामना महत्त्वाचा असणार आहे. भारताच्या संघासाठी हा सामना करो या मरो असणार आहे, टीम इंडिया आज युएईविरुद्ध लढणार आहे. भारताच्या अ संघाला सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवणे अनिवार्य असणार आहे, भारत विरुद्ध यूएई सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.
भारत विरुद्ध यूएई यांच्यामध्ये इमर्जिंग आशिया कप 2026 चा ग्रुप स्टेजचा भारताचा शेवटचा सामना हा 24 नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. हा सामना युनिव्हर्सिटी ऑफ दोहा फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी दोहा येथे या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार या सामन्याची सुरुवात 11.30 वाजता होणार आहे तर या सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार हे 11.00 वाजता मैदानावर येतील. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया कमबॅक करण्याच्या इराद्यात असेल.
हे ही वाचा
शाळा बुडवून गेले मॅच पाहायला, चोरी कॅमेऱ्यामध्ये कैद! कॅमेरामनची नजर अन्; Video viral
भारत विरुद्ध यूएई यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्यात टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही मोबाईल, पीसी किंवा लॅपटॅापवर देखील पाहू शकता. भारत विरुद्ध यूएई या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही सोनी लिव्ह चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मात्र, सोनी लिव्हवर सामना पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शनची आवश्यकता असेल. वैभव सूर्यंवशी आतापर्यत झालेल्या दोन्ही सामन्यामध्ये तो फेल झाला आहे, तर मागील सामन्यामध्ये अभिषेक शर्माने संघासाठी अर्धशतक झळकावले पण तो संघाला विजयापर्यत नेण्यात अपयशी ठरला. तिलक वर्माने मागील दोन्ही सामन्यामध्ये शतक झळकावले होते पण मागील सामन्यामध्ये तो शतक झळकावूनही त्याची खेळी संथ पाहायला मिळाली.
भारत अ : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्रा (विकेटकिपर), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्षित राणा, प्रिन्स यादव, हर्ष दुबे, प्रभसिमरन सिंग, तनुष कोटियन आणि अरशद खान.