SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुंबईच्या लेकाने रणजी ट्रॉफीत पाडला धावांचा पाऊस! 400 धावांचा पराक्रम, कोण आहे चिन्मय सुतार?

चिन्मय सुतारने आता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. कोण आहे चिन्मय सुतार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 05, 2026, 04:10 PM IST | Updated: Nov 05, 2026, 05:08 PM IST
Join

रणजी ट्रॅाफीचे सामने सुरु आहेत, यामध्ये काही मोठे भारतीय संघातील क्रिकेट खेळाडू देखील सहभागी झाले आहेत. मागील काही दिवसांपासून ही स्पर्धा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मिझोरामकडून खेळणारा 29 वर्षीय खेळाडू भारतीय क्रिकेटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रणजी ट्रॉफीमध्ये मिझोरामकडून खेळणारा चिन्मय सुतारने विक्रमी कामगिरी केली आहे. रणजी ट्रॅाफीमध्ये पहिल्याच नागालँडविरुद्धच्या प्लेट ग्रुप सामन्यात नाबाद 400 धावांची खेळी खेळल्यानंतर तो चर्चेत आला. त्याने आता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. कोण आहे चिन्मय सुतार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. 

चिन्मय सुतारच्या रणजी ट्रॅाफी 2026 च्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर मिझोरामसाठी खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने 175 धावांची खेळी खेळली. चिन्मयने प्रथम-श्रेणी क्रिकेटच्या पहिल्या पाच डावांमध्ये 834 धावा ठोकल्या आहेत. चिन्मय हा प्रथम-श्रेणी क्रिकेटच्या पहिल्या पाच डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या बिल पॉन्सफोर्ड यांचा विक्रम मोडला, ज्यांनी 724 धावा केल्या होत्या. पॉन्सफोर्ड यांनी हा विक्रम 1921 ते 1923 दरम्यान आपल्या नावावर ठेवला होता. त्यांचा हा विक्रम 103 वर्षे टिकून होता.

हे ही वाचा

IPL 2027: ऑक्शनपूर्वी CSK-SRH चा मोठा डाव, 4 खेळाडूंची अदलाबदल; कोण कोणत्या संघात एकदा पाहाच

रणजी ट्रॅाफीच्या सहाव्या डावामध्ये चिन्मय सुतारने एकही धाव केलेली नाही तरीही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्या डावामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये तो अव्वल स्थानावर आहे. चिन्मय सुतारने अफगाणिस्तानच्या बशीर शाहला मागे टाकले, ज्याने आपल्या पहिल्या सहा प्रथम-श्रेणी डावांत 831 धावा केल्या होत्या. चिन्मय सुतार सध्या 29 वर्षे आणि 186 दिवसांचा आहे. अशा वेळी जेव्हा अनेक तरुण खेळाडू भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत, तेव्हा तो सातत्याने मोठे विक्रम प्रस्थापित करत आहे.

कोण आहे चिन्मय सुतार?

चिन्मयने चालू रणजी ट्रॉफी हंगामात मणिपूरविरुद्ध प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चिन्मय सुतार आपल्या यशाचे श्रेय मुंबई क्रिकेटमधील सुरुवातीच्या काळात शिकलेल्या धड्यांना देतो. त्याने TOI ला सांगितले की, तो आपल्या सातत्यपूर्ण धावा आणि विश्वविक्रम प्रस्थापित करण्याबद्दल आनंदी आहे. त्याने स्पष्ट केले की, मुंबई क्रिकेटमधील सुरुवातीच्या काळात तो शिकला की, जेव्हा एखादा फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असतो, तेव्हा त्याने शक्य तितक्या जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES