रमेश पवार मुख्य निवडकर्ता का झाले नाहीत? बीसीसीआयने स्वत: केले स्पष्ट
मागील काही दिवसांपासून भारतीय पुरुष संघाचे पुढील मुख्य निवडकर्ते कोण असणार यासंदर्भात चर्चा सुरु होत्या. बीसीसीआयने आता रमेश पवार यांची निवड समितीमध्ये नियुक्ती केली आहे, पण त्यांना मुख्य निवडककर्ताचे पद का देण्यात आले नाही?
भारताच्या पुरुष संघाचे निवडकर्ते अजित आगारकर यांचा कार्यकाळ संपला, त्यानंतर मागील काही दिवसांपासून भारतीय पुरुष संघाचे पुढील मुख्य निवडकर्ते कोण असणार यासंदर्भात चर्चा सुरु होत्या. आता बीसीसीआयने भारतीय पुरुष संघाच्या मुख्य निवडकर्त्यांची घोषणा केली आणि सोशल मिडियावर अनेक माजी खेळाडूंची नावे समोर आली होती. बीसीसीआयने आता रमेश पवार यांची निवड समितीमध्ये नियुक्ती केली आहे. सर्वाधिक कसोटी सामने खेळलेले प्रज्ञान ओझा हे समितीच्या अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारतील. रमेश पवार हे अजित आगरकर यांच्या जागी पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करतील. आता रमेश पवार यांना का मुख्य प्रशिक्षकपद नाही दिले यासंदर्भात सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत.
मागील काही वर्षांमध्ये भारताच्या संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर कमालीची कामगिरी केली आहे. माजी भारतीय खेळाडू प्रज्ञान ओझा सप्टेंबर 2025 मध्ये टीम इंडियाचे निवडकर्ता बनले. त्यावेळी आरपी सिंग हे देखील निवडकर्ता होते. त्यावेळी अजित आगरकर मुख्य निवडकर्ता होते. आगरकर जुलै 2023 मध्ये टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता बनले. ते तीन वर्षांहून अधिक काळ टीम इंडियाच्या निवडीमध्ये सहभागी होते. त्यांनी तीन आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांची जागा घेणे सोपे नव्हते. आता प्रज्ञान ओझा यांना निवडकर्ता का करण्यात आले यासंदर्भात वाचा.
हे ही वाचा
बीसीसीआयच्या मुख्य निवडर्त्यांची घोषणा, 'या' माजी खेळाडूने घेतली अजित आगरकर यांची जागा
भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीशी संबंधित जबाबदाऱ्यांच्या फेरबदलात, बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) रमेश पवार यांची शिफारस केली. अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीने बीसीसीआयच्या मुख्यालयात अर्जदारांची छाननी आणि मुलाखत प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर पुरुष निवड समितीचे सदस्य म्हणून पवार यांची एकमताने शिफारस करण्यात आली. रमेश पवार यांच्या नियुक्तीनंतर, बीसीसीआयने प्रज्ञान ओझा हे टीम इंडियाचे पुढील मुख्य निवडकर्ता असतील अशी घोषणा केली. निवड समितीवरील सर्व माजी खेळाडूंमध्ये ओझाने सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत, आणि आता याचा त्याला फायदा झाला आहे. सध्याच्या निवड समितीत प्रज्ञान ओझा, रमेश पवार, आरपी सिंग आणि अजय रात्रा यांचा समावेश आहे. या पाच सदस्यांवर आता 2027च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्याची जबाबदारी असेल.
प्रज्ञान ओझाचा रेकॉर्ड कसा आहे?
प्रज्ञान ओझाने टीम इंडियासाठी एकूण 24 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने 30.26 च्या सरासरीने 113 बळी घेतले. या काळात ओझाने सात वेळा 5 बळी आणि एकदा 10 बळी घेतले आहेत. त्याने भारतीय क्रिकेट संघासाठी 18 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ओझाने 31.04 च्या सरासरीने 21 बळी घेतले आहेत. प्रज्ञानचा इकॉनॉमी रेट 4.46 राहिला आहे. ओझाने 6 टी-20 सामनेही खेळले आहेत. प्रज्ञानने 13.20 च्या सरासरीने 10 बळी घेतले असून त्याचा इकॉनॉमी रेट 6.28 राहिला आहे.