SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

‘ना बॅटिंग येत, ना बॉलिंग’, 'ओढून ताणून तो अष्टपैलू' म्हणत माजी कॅप्टनची 'या' खेळाडूवर टीका; 2027 वर्ल्डकपसाठी अयोग्य असल्याचा शेरा

2027 चा वर्ल्डकप हा रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांसाठी शेवटचा वर्ल्डकप ठरणार आहे. असं असतानाच हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी संघ बांधणी सुरु असतानाच त्यावरुन कठोर शब्दांमध्ये माजी कर्णधाराने सुनावलं आहे. त्याचा नेमका आक्षेप काय आहे पाहूयात...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 06, 2026, 02:27 PM IST | Updated: Oct 06, 2026, 02:44 PM IST
Image Credit: वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर केली टीका (प्रातिनिधिक फोटो)
Join

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेमधील शेवटच्या सामन्यात भारताने पराभवाचं तोंड पहावं लागलं. विशेष म्हणजे या सामन्यात भारताने 350 हून अधिक धावांचं टार्गेट देऊनही वेस्ट इंडिजसारख्या संघाला रोखण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आल्याने सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली असली तरी शेवटचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. 2027 चा वर्ल्डकप जिंकणाऱ्याची स्वप्न पाहणाऱ्या भारताला परफेक्ट संघ सापडलेला नसून संघात अष्टपैलू खेळाडूचीही कमतरता जाणवतेय. याच मुद्द्यावरुन सध्या भारतीय संघ व्यवस्थापनाकडून अष्टपैलू खेळाडूसाठी जे प्रयोग केले जात आहेत ते पाहता उगाच एका खेळाडूला ओढून ताणून तो अष्टपैलू असल्याचं भासवलं जात असल्याचा गंभीर आरोप एका माजी कर्णधाराने केला असून संघ व्यवस्थापनावर टीकास्र सोडलंय.

कोणी आणि कोणावर केलीये टीका?

दुखापतीमुळे हार्दिक पांड्या हा अनिश्चित काळापासून मैदानापासून दूर असताना वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेमध्ये नितीश रेड्डीला संधी देण्यात आलेली. मात्र त्याची कामगिरी पाहून भारतीय संघाचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत चांगलेच संतापलेत. शेवटच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी, नितीश रेड्डीला संघात स्थान देण्यावरुनच प्रश्न उपस्थित केलाय. नितीश कुमार रेड्डीला ओढून ताणून अष्टपैलू खेळाडू असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय असं कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी म्हटलं आहे. 

ना बॅटींग धड ना बॉलिंग

एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम सामन्यामध्ये नितीश रेड्डीने ज्या पद्धतीने सुमार खेळ केला, त्यावर बोट ठेवताना कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी, त्याला ना बॅटिंग येत, ना बॉलिंग जमत, असं म्हटलंय. नितीश रेड्डी हा 23 वर्षीय तरुण खेळाडू अगदीच क्लूलेस वाटत होता. त्याने 16 चेंडूंमध्ये 9 धावा केल्या. गोलंदाजी करताना त्याने 6.5 ओव्हरमध्ये 50 धावा देत एकही विकेट घेतली नाही. यावरुनच टीका करताना कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी, "एकदा का चेंडू अधिक उसळी घेऊ लागला की नितीश रेड्डी गोंधळायला लागतो. त्याला फलंदाज चोपत असतानाही तो तसेच चेंडू टाकत राहतो. ते सर्वजण त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे भारतीय संघासाठी चांगले संकेत नाहीत. उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर त्याच्या फलंदाजीबद्दलही शंका येते," असं स्पष्टपणे म्हटलं आहे.

अनेकदा संधी दिली तरी...

नितीश रेड्डीला हार्दिकची रिप्लेसमेंट म्हणून अनेकदा संधी दिली जात आहे. मागील काही सामन्यामध्ये नितीशला बऱ्याचा अंतीम 11 खेळाडूंमध्ये म्हणजेच प्लेइंग इलेव्हमध्ये संधी देण्यात आली आहे. मात्र आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ 3 विकेट्स मिळाल्या असून त्याने 91.33 च्या सरासरीने धावा दिल्या. त्याने फलंदाजीमध्येही 27.25 च्या सरासरीने पाच डावांमध्ये धावा केल्या आहेत.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES