SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

WPL 2027 ऑक्शननंतर सर्व 5 संघातील खेळाडूंची संपूर्ण लिस्ट, पहा एका क्लिकवर

WPL 2027 All Teams Players List : बुधवारी 28 ऑक्टोबर रोजी महिला प्रीमिअर लीग 2027 चा मिनी ऑक्शन पार पडला. या ऑक्शनमध्ये WPL चे सर्व 5 संघ सहभागी झाले होते. तेव्हा आगामी WPL 2027 साठी झालेल्या मिनी ऑक्शननंतर सर्व 5 संघातील खेळाडूंची संपूर्ण लिस्ट पाहून घ्या.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 29, 2026, 07:49 AM IST | Updated: Oct 29, 2026, 08:33 AM IST
Image Credit: WPL 2027 ऑक्शननंतर सर्व 5 संघातील खेळाडूंची संपूर्ण लिस्ट
Join

 WPL 2027 All Teams Players List : महिला प्रीमियर लीगच्या आगामी 2027 च्या सीजनसाठी बुधवारी ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये तब्बल 150 खेळाडूंवर बोली लागली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स इत्यादींनी आपल्या संघातील रिक्त जागा भरल्या. या ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाची ऑलराऊंडर खेळाडू सोफी मोलिनेक्स ही ऑक्शनमध्ये सर्वात महागडी खेळाडू ठरली. यूपी वॉरियर्सने तिला 1.10 कोटी रूपयांना खरेदी केलं.

यूपी वॉरियर्सकडे ऑक्शनपूर्वी खेळाडूंसाठी सर्वाधिक 8 स्लॉट्स शिल्लक होते, तर मुंबई इंडियन्सकडे 6 स्लॉट्स शिल्लक होते. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याकडे एकूण प्रत्येकी 5-5 स्लॉट्स शिल्लक होते. तर गुजरात टायटन्सकडे एकूण 3 खेळाडूंची जागा शिल्लक होती.

WPL 2027 ऑक्शनमध्ये कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूला खरेदी केलं?

यूपी वॉरियर्सने 8 खेळाडूंना खरेदी केलं :

सोफी मोलिनेक्स (1.10 कोटी), स्नेह राणा (30 लाख), ग्रेस हॅरिस (30 लाख), सुषमा वर्मा (30 लाख), कॅथरीन ब्राइस (10 लाख), मनाली दक्षिणी (10 लाख), स्नेहा पवार (10 लाख), आशा शोभना (10 लाख).

मुंबई इंडियन्सने 6 खेळाडूंना खरेदी केलं :

श्वेता सेहरावत (20 लाख), अक्षिता भगत (10 लाख), सानिका चालके (10 लाख), भारती रावल (10 लाख), लतिका इनामदार (10 लाख), दिशा कसाट (10 लाख).

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 4 खेळाडूंना खरेदी केलं :

जेस जोनासन (40 लाख), क्लो ट्रायन (30 लाख), तेजल हसबनीस (30 लाख), वृंदा दिनेश (10 लाख)

दिल्ली कॅपिटल्सने 4 खेळाडूंना खरेदी केलं :

किरण नवगिरे (75 लाख), काश्वी कंदिकुप्पा (10 लाख), किर्स्टी गॉर्डन (10 लाख), नजमा खान (10 लाख)

गुजरात जायंट्सने 3 खेळाडूंना खरेदी केलं :

गुनालन कमलिनी (40 लाख), ओर्ला प्रेंडरगास्ट (30 लाख), समाइरा राघव (10 लाख)

WPL 2027 साठी सर्व 5 संघातील खेळाडूंची लिस्ट :

यूपी वॉरियर्स :

दीप्ति शर्मा, हरलीन देयोल, क्रांति गौड़, मेग लॅनिंग, फोएबे लिचफील्ड, प्रतिका रावल, शिखा पांडे, शिप्रा गिरी, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, तारा नॉरिस, सोफी मोलिनक्स, स्नेह राणा, ग्रेस हैरिस, सुषमा वर्मा, कैथरीन ब्राइस, मनाली दक्षिणी, सहाना पवार, आशा सोभना.

मुंबई इंडियन्स :

अमनजोत कौर, अमेलिया केर, हरमनप्रीत कौर, हेले मैथ्यूज, नताली साइवर ब्रंट, निकोला कैरी, राहिला फिरदौस, सजीवन सजना, संस्कृति गुप्ता, शबनीम इस्माइल, वैष्णवी शर्मा, सानिका चालके, श्वेता सहरावत, अक्षिता भगत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :

अरुंधति रेड्डी, एलिसे पेरी, जॉर्जिया वोल, लॉरेन बेल, नादिन डी क्लार्क, पूजा वस्त्राकर, प्रथ्योषा कुमार, प्रेमा रावत, राधा यादव, ऋचा घोष, सयाली सतघरे, श्रेयंका पाटिल, स्मृति मंधाना, जेस जोनासेन, तेजल हसब्निस, वृंदा दिनेश, क्लो ट्रायॉन.

दिल्ली कॅपिटल्स :

एनाबेल सदरलैंड, चिनेले हेनरी, दीया यादव, जेमिमाह रोड्रिग्ज, लौरा वोल्वार्ड्ट, लुसी हॅमिल्टन, ममता मादीवाला, मारिजैन कप्प, मिन्नू मणि, एन श्री चरणानी, नंदनी शर्मा, निकी प्रसाद, शेफाली वर्मा, किरण नवगिरे, किर्स्टी गॉर्डन, उमा काशवी, किर्स्टी गॉर्डन, नाजमा खान.

गुजरात टायटन्स :

अनुष्का शर्मा, एशले गार्डनर, बेथ मूनी, भारती फुलमाली, जॉर्जिया वेयरहैम, हॅप्पी कुमारी, जिन्तिमणि कलिता, कनिका आहूजा, काशवी गौतम, किम गर्थ, राजेश्वरी गायकवाड़, रेणुका सिंह, सोफी डिवाइन, तनुजा कंवर, यास्तिका भाटिया, जी कमलिनी, ओर्ला प्रेंडरगॅस्ट, समायरा राघव. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES