SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आयफोन 3 लाखांचा पण दुरुस्तीचा खर्च पाहून ग्राहकांना फुटला घाम, डिस्प्ले खराब झाल्यास मोजावे लागतील इतके लाख

अॅपलचा आयफोन घेणार आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 18, 2026, 01:34 PM IST | Updated: Oct 18, 2026, 01:35 PM IST
Image Credit: apple iphone duo repair costs revealed
Join

अलीकडेच अॅपलने आयफोन 18 सिरीज लाँच केली आहे. iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे आपले नवे प्रीमियम स्मार्टफोन असून मार्च 2027 पर्यंत ते विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तर, अॅपलचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आयफोन ड्युओच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. सर्वात महागडा असलेल्या या फोनच्या दुरुस्ती खर्चाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

अॅपलचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आयफोन ड्युओची किंमत 2 लाख 99 हजार 900  रुपये आहे. या फोनच्या किंमतीवरून आणि त्याच्या दुरुस्तीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा फोन बिघडल्यास दुरुस्त करायचा असेल तर त्यासाठी तब्बल सवादोन लाख रुपये खर्च करावे लागतील, असे समोर आले आहे.

आयफोन ड्युओची तीन लाख रुपये किंमत पाहून आधीच ग्राहकांना घाम फुटला आहे. आता या फोनच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च अन्य 
पाहून ग्राहकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. विना अॅपल केअर प्लस, बाहेरचा डिस्प्ले बदलण्यासाठी 1 लाख 19 हजार 900 रुपये खर्च येऊ शकतो.

तसंच, फोनसाठी अॅपल केअर प्लस प्लॅन घ्यायचा असेल तर यासाठी एकाच वेळी 51,900 रुपये किंवा दर महिन्याला 4,709 रुपये द्यावे लागतील. जर एखादा ग्राहक आयफोन ड्युओ सोबत अॅपल केअर प्लस प्लॅन घेत असेल तर त्या ग्राहकाला एकूण खर्च 3,51,800  रुपये द्यावे लागतील. फोनला काही झाल्यास त्यासाठी 2,24,900 रुपये खर्च येईल.

iPhone Duo (आईफोन ड्युओ) हा Apple चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे, जो सप्टेंबर 2026 मध्ये लाँच झाला असून भारतात याची विक्री 23 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे. iPhone Duo ची खासियत म्हणजे या फोनमध्ये कंपनीने 7.6 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला आहे. इतक्या मोठ्या आकाराचा डिस्प्ले यापूर्वी कोणत्याही आयफोनमध्ये देण्यात आला नव्हता. तसंच, फोनच्या बाजूस 5.4 इंचाचा डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.

iPhone Duo मध्ये ड्युअल बॅटरी सिस्टम दिली असून फिजिकल सिम स्लॉट नाही, हा फोन फक्त eSIM वर चालतो. तर  48 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप (मेन आणि अल्ट्रा-वाईड लेन्स) दिला आहे. यात साइड-माउंटेड टच आयडी (Touch ID), Apple Pencil चे सपोर्ट, आणि ड्युअल 16-कोर न्यूरल इंजन आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES