SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी! 1 नोव्हेंबरपासून मोफत धान्य बंद होणार? जाणून घ्या सत्य

1 नोव्हेंबर 2026 पासून पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांना मोफत धान्य देण्यात येणार नाही.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 29, 2026, 11:15 AM IST | Updated: Oct 29, 2026, 11:36 AM IST
Image Credit: ration card
Join

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बातमी तुफान व्हायरल होत आहे. या बातमीमध्ये अशा दावा केला आहे, येत्या 1 नोव्हेंबर 2026 पासून पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांना मोफत धान्य देण्यात येणार नाहीय. या आशयाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बातम्यांमध्ये करण्यात आलेल्या दाव्यामागे किती सत्य आहे, जाणून घ्या. 

 

सोशल मीडियाच्या व्हायरल मेसेजमध्ये पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डाधारकांना 1 नोव्हेंबर 2026 मोफत धान्य बंद करण्यात येणार आहे. या बातम्यांमुळे जे रेशनकार्ड धारक मोफत धान्य घेतात त्यांच्यामध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारकडून या दाव्याबद्दल स्पष्टता देण्यात आली आहे. सरकारचे सोशल मीडियावरील अकाऊंट MAHARASHTRA DGIPR वर पोस्ट करुन त्यांनी हा दावा दिशाभूल करणारा आहे, हे स्पष्ट केलं आहे.

त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं की, पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांचे मोफत धान्य 1 नोव्हेंबर 2026 पासून बंद होणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा आहे.  असा कोणताही आदेश नाही. केंद्र सरकारच्या मिशन सुधार उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात अपात्र, दुबार, मृत, स्थलांतरित आणि निष्क्रिय नोंदी ओळखण्यासाठी शिधापत्रिकांची पडताळणी केली जात आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून काही शिधापत्रिका वगळण्यात आल्या असून, त्याचा परिणाम जवळपास 2.85 लाख लाभार्थ्यांवर झाला असल्याची माहिती आहे. तर पात्र लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे धान्य मिळणार आहे. 

त्यामुळे या बातम्या खोट्या असून रेशनकार्ड धारकांना चिंता करण्याची गरज नाही. दिवाळीच्या तोंडावर अशा बातम्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंता वाढली होती. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES